महिनाभरासाठी फेसबुक सोडाल, तर सुखी व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:09 PM2019-02-05T16:09:45+5:302019-02-05T16:10:59+5:30

न्युयॉर्कच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये दररोज फेसबुकवर व्यस्त असलेल्या लोकांना काही काळासाठी फेसबुक सोडले होते.

If you leave Facebook for a month, you'll be happy ... | महिनाभरासाठी फेसबुक सोडाल, तर सुखी व्हाल...

महिनाभरासाठी फेसबुक सोडाल, तर सुखी व्हाल...

googlenewsNext

वॉशिंग्टन : सोशल मिडियावर सारखे-सारखे व्यस्त राहिल्याने चिडचिड, झोप न येणे सारखे विकार बळावतात. हेच फेसबुक काही काळासाठी सोडल्यास मानसिकदृष्ट्या चांगले ठरणार आहे. मात्र, यामुळे अज्ञानात वाढ होण्याचीही शक्यता असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. 

न्युयॉर्कच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी हे संशोधन केले आहे. यामध्ये दररोज फेसबुकवर व्यस्त असलेल्या लोकांना काही काळासाठी फेसबुक सोडले होते. त्याच्या भावनांमध्ये कामालीचा बदल पाहण्यास मिळाला. तसेच काही लोकांच्या सामान्य ज्ञानामध्ये कमतरता जाणवली. 

फेसबुकचा वापर बंद केल्यानंतर युजर्सनी दुसऱ्या वेबसाईटवरही जाणेही आपोआप कमी केले. तसेच त्यांची राजकीय आवडही कमी झाली. मात्र, याचा परिणामही त्यांच्या ज्ञानावर झाला. आजुबाजुच्या जगात काय सुरु आहे, काय नाही, याबाबत या युजरना काहीच माहिती नसल्याचे जाणवले. 

कुटुंबाला दिला वेळ

फेसबुकचा वापर करताना कुटुंबातील सदस्य समोर असले तरीही त्यांच्याकडे लक्ष जात नव्हते. मात्र, या काळात त्यांनी फेसबुकवर जाणारा वेळ कुटुंबाला दिला. मात्र, हा काळ संपल्यानंतर या लोकांनी पुन्हा फेसबुककडे आपला मोर्चा वळविला. 

Web Title: If you leave Facebook for a month, you'll be happy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.