व्हिडीओ कॉलिंग क्षमतेसह 55 इंचाचा 4K Smart TV लाँच; फ्लिपकार्टवर iFFalcon K72 होणार उपलब्ध
By सिद्धेश जाधव | Published: September 9, 2021 12:30 PM2021-09-09T12:30:47+5:302021-09-09T12:30:55+5:30
टीसीएलने भारतात iFFalcon K72 55 inch 4K TV भारतात लाँच केला आहे. या टीव्हीचा वापर करून घरातील इतर स्मार्ट डिवाइस नियंत्रित करता येतील.
TCL ने आपल्या सब-ब्रँड iFFalcon अंतर्गत 55 इंचाचा 4K Smart TV भारतात लाँच केला आहे. iFFalcon K72 55 inch 4K TV देशात सादर झालेला हा टीव्ही अँड्रॉइड टीव्ही 11 वर चालतो. तसेच यात डॉल्बी विजन, डॉल्बी अॅटमॉस, रीयल-टाइम ऑडियो आणि व्हिज्युअल ऑप्टिमाइजेशन असे फीचर्स देण्यात आले आहेत. या टीव्हीची खासियत म्हणजे यात व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
iFFalcon चे स्पेसिफिकेशन्स
iFFalcon K72 55-inch 4K TV च्या माध्यमातून घरातील इतर स्मार्ट गॅजेट्स नियंत्रित करता येतात. यासाठी AIxIoT टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तसेच या टीव्हीच्या फ्रंटला असलेल्या कॅमेरा व्हिडीओ कॉलिंगचा ग्रँड अनुभव देऊ शकतो. हा 4K टीव्ही HDR10 सहित अनेक HDR फॉर्मेटला देखील सपोर्ट करतो. तसेच यातील MEMC सपोर्ट युजर्सना स्मूद व्हिज्युअल एक्सपीरियंस देतो.
टीसीएलच्या या टीव्हीमध्ये YouTube, Netflix, Disney+ Hostar आणि इतर अनेक ओटीटी अॅप्स आधीपासून इंस्टॉल आहेत. तसेच इन-बिल्ट Google Play स्टोरच्या माध्यमातून अजून डाउनलोड करता येतील. हॅन्ड्स फ्री व्हॉइस कंट्रोल 2.0 च्या मदतीने टीव्हीमधील इतर फीचर्स नियंत्रित करता येतात.
iFFalcon K72 ची किंमत
iFFalcon K72 55-inch 4K TV ची किंमत किंमत 51,999 रुपये ठेवण्यात आली आहे आहे. या किंमतीसह हा टीव्ही फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल. या टीव्हीवर मिळणाऱ्या बँक ऑफर अंतर्गत 1,250 रुपयांची सूट मिळू शकते.