आयमॅक प्रो : जाणून घ्या फिचर्स व भारतातील मूल्य
By शेखर पाटील | Published: December 20, 2017 10:36 AM2017-12-20T10:36:19+5:302017-12-20T12:21:23+5:30
अॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे
मुंबई - अॅपलने आपले आयमॅक प्रो हे उच्च श्रेणीतले वर्कस्टेशन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
अॅपलच्या आयमॅक प्रो या मॉडेलची अमेरिकेत विक्री सुरू झाली आहे. यासोबत हे वर्कस्टेशन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. हे मॉडेल विविध व्हेरियंटमध्ये ग्राहकांना सादर करण्यात येणार असून याच्या बेस मॉडेलचे मूल्य ४१,५०० रूपये असून अन्य व्हेरियंट हे यापेक्षा जास्त मूल्याचे आहेत.
आयमॅक प्रो या मॉडेलमध्ये अतिशय उच्च दर्जाचे फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. यातील बेस मॉडेलमध्ये २७ इंच आकारमानाचा रेटीना या प्रकारातील तब्बल ५-के म्हणजे ५१२० बाय २८८९ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात ८-कोअर इंटेल झेनॉन डब्ल्यू प्रोसेसर देण्यात आला आहे. याला ८ जीबी रॅमयुक्त रॅडीऑन प्रो व्हेगा ५६ या ग्राफीक कार्डची जोड देण्यात आली आहे. यात तब्बल ३२ जीबी रॅम तर एक टेराबाईट (टिबी) स्टोअरेज देण्यात आले आहे. हायर व्हेरियंटसाठी १२८ जीबीपर्यंत रॅम आणि ४ टेराबाईट स्टोअरेजचे पर्याय असतील.
आयमॅक प्रो वर्कस्टेशनमध्ये १०८० पिक्सल्स क्षमतेचा फेसटाईम एचडी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबत स्पेस ग्रे मॅजिक कि-बोर्ड आणि मॅजिक माऊस असेल. तर यातील फिचर्समध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, युएसबी, इथरनेट पोर्ट, चार युएसबी टाईप-ए पोर्ट, चार थंडरबोल्ट पोर्ट, तीन युएसबी टाईप-सी पोर्ट, चार मायक्रोफोन्स, हेडफोन जॅक, एसडीएक्ससी कार्ड स्लॉट आदींचा समावेश असेल.
आयमॅक प्रो हे मॉडेल उच्च ग्राफीक्स, थ्री-डी इमेजींग, रिअलटाईम ४-के अथवा ८-के व्हिडीओ एडिटींग तसेच उच्च क्षमतेची आवश्यकता असणार्या विविध प्रोफेशनल कामांसाठी वापरणे शक्य आहे.