Airtel, Jio, BSNL, VI युजर्स लक्ष द्या! आता सिम कार्ड खरेदीसाठी नियम बदलले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 03:01 PM2024-09-15T15:01:36+5:302024-09-15T15:02:51+5:30

SIM Card : दूरसंचार विभागाने (DoT) आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे सिम कार्डसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत.

Important news for Airtel, Jio, BSNL, VI users, now the rules for SIM card purchase have changed | Airtel, Jio, BSNL, VI युजर्स लक्ष द्या! आता सिम कार्ड खरेदीसाठी नियम बदलले...

Airtel, Jio, BSNL, VI युजर्स लक्ष द्या! आता सिम कार्ड खरेदीसाठी नियम बदलले...

SIM Card :  नवी दिल्ली : मोबाईल सिमकार्ड खरेदीचे नियम बदलले आहेत. आता Airtel, Jio, BSNL किंवा Vodafone-Idea चे नवीन सिम खरेदी करताना युजर्सना जास्त काळजी घेण्याची गरज नाही. दूरसंचार विभागाने (DoT) आता पूर्णपणे पेपरलेस केले आहे. तुम्हाला आता नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल किंवा ऑपरेटर बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यापुढे टेलिकॉम कंपन्यांच्या कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्ही स्वतः तुमच्या सिम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करू शकाल.

दूरसंचार विभागाने (DoT) आपल्या अधिकृत एक्स हँडलद्वारे सिम कार्डसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. तसेच, युजर्सना नवीन सिम कार्ड खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. दूरसंचार विभागाचा हा नवा नियम युजर्सच्या वैयक्तिक कागदपत्रांसोबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी आहे. तसेच डिजिटल इंडिया अंतर्गत संपूर्णपणे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.

SIM Card चा नवीन नियम
- दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या टेलिकॉम रिफॉर्म करत असताना, आता युजर्ससाठी ई-केवायसी (नो युवर कस्टमर) सोबत सेल्फ-केवायसी आणले आहे.
- प्रीपेड वरून पोस्टपेड नंबर बदलण्यासाठी युजर्सना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्याची गरज नाही. युजर्स आता OTP म्हणजेच वन टाईम पासवर्डवर आधारित सेवेचा लाभ घेऊ शकतील.
- युजर्स कोणतीही फोटोकॉपी किंवा डॉक्युमेंट शेअर न करता नवीन सिम कार्ड खरेदी करू शकतात.
- दूरसंचार विभागाच्या या पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेमुळे युजर्सच्या कागदपत्रांचा गैरवापर टाळता येईल. त्यामुळे आता कोणाच्याही नावाने बनावट सिम जारी करता येणार नाही.

काय आहे आधार बेस्ड e-KYC आणि सेल्फ KYC?
दूरसंचार विभागाने केवायसी रिफॉर्ममध्ये आधार कार्ड आधारित ई-केवायसी, सेल्फ केवायसी आणि ओटीपी आधारित सेवा स्विचची सुविधा सुरू केली आहे. नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी युजर्स आता फक्त आधार कार्ड वापरू शकणार आहेत. टेलिकॉम कंपन्या युजर्सच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आधार आधारित पेपरलेस व्हेरिफिकेशन फीचर वापरतील. यासाठी फक्त एक रुपये (जीएसटीसह) खर्च येईल.

एवढेच नाही तर दूरसंचार विभागाने युजर्सना आपले केवायसी ऑनलाइन पडताळण्यासाठी सेल्फ केवायसीची सुविधाही सुरू केली आहे. डिजीलॉकर वापरून युजर्स आपल्या केवायसीची स्वतः पडताळणी करू शकतील. जर कोणत्याही युजर्सला आपला नंबर प्रीपेडवरून पोस्टपेड किंवा पोस्टपेडवरून प्रीपेडवर स्विच करायचा असेल तर त्याला टेलिकॉम ऑपरेटरच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण, युजर्स OTP आधारित पडताळणी प्रक्रियेद्वारे कनेक्शन बदलू शकतील.

Web Title: Important news for Airtel, Jio, BSNL, VI users, now the rules for SIM card purchase have changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.