Sony चा दावा, DSLR कॅमेऱ्याला विसरतील लोक, स्मार्टफोनची फोटो क्वॉलिटी असेल एक नंबर
By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2022 04:21 PM2022-06-14T16:21:37+5:302022-06-14T16:22:02+5:30
येत्या काही वर्षांमध्ये स्मार्टफोन कॅमेरा सेन्सर DSLR कॅमेऱ्याला देखील मागे टाकेल, असा दावा Sony नं केला आहे.
Sony कंपनी आपल्या डिव्हाइसेसच्या क्वॉलिटीसाठी ओळखली जाते. कंपनीचे स्मार्टफोन, टीव्ही, ऑडिओ प्रोडक्ट आणि प्रोफेशनल कॅमेऱ्यांचं युजर्सकडून तोंडभरून कौतुक केलं जातं. आता जरी कंपनी स्मार्टफोन सेगमेंट सक्रिय नसली तरी कंपनीनं बनवलेल्या कॅमेरा सेन्सरचा वापर अनेक प्रीमियम फोन्समध्ये केला जातो. ज्यात Xiaomi, OnePlus सारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, Sony नं दावा केला आहे की, येत्या काही वर्षांत स्मार्टफोनचा कॅमेरा सेन्सर प्रोफेशनल DSLR कॅमेऱ्याला मागे टाकेल. स्मार्टफोनमधून देखील चांगल्या क्वॉलिटीचे फोटो क्लीक करता येतील.
Nikkei च्या रिपोर्टनुसार, Sony Semiconductor Solutions (SSS) चे CEO आणि प्रेसिडेंट Terushi Shimizu यांनी म्हटलं आहे की, “सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेऱ्यातून घेतलेल्या फोटोच्या क्वॉलिटीला स्टिल इमेज काही वर्षांमध्ये रिप्लेस करेल.” कंपनीच्या 2024 च्या रोडमॅपच्या प्रजेंटेशनमध्ये सांगण्यात की, Sony चे स्मार्टफोन ILC इमेज क्वॉलिटीला मागे टाकतील.
DSLR के मुकाबले बेहतर होगा स्मार्टफोन कॅमेरा
येत्या काही वर्षांमध्ये कमी सेन्सर असलेला कॅमेरा जास्त लाईटसह फोटो क्लिक करू शकतील. परंतु हे कॅमेरा सेन्सर DSLR मधील APS-C कॅमेऱ्याची जागा घेतील की नाही, ते पाहावं लागेल. विशेष म्हणजे Sony च्या फ्लॅगशिप मिररलेस कॅमेऱ्यात या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ लागला आहे, त्यामुळे कंपनीचा दावा खरा होऊ शकतो. कंपनी आपल्या AI प्रोसेसिंग क्षमता देखील सुधारण्याची योजना बनवत आहे. त्यामुळे मल्टी फ्रेम HDR, लाँग रेंज झूम आणि हाय क्वॉलिटी व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येईल.
Sony व्यतिरिक्त Samsung देखील स्मार्टफोन कॅमेरा टेक्नॉलॉजीवर खूप काम करत आहे. दक्षिण कोरियन कंपनीनं सर्वात पहिला 108MP चा कॅमेरा सेन्सर लाँच केला होता. तसेच 200MP चा कॅमेरा सेन्सर सादर करणार देखील ही पहिली कंपनी आहे. परंतु DSLR च्या तोडीचा कॅमेरा सेन्सर कोण सादर करतं, हे पाहावं लागेल.