ऐकावं ते नवलच! ॲपलच्या या डिव्हाइसने केली कमाल; महिलेचा हरवलेला कुत्रा दिला शोधून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 12:23 PM2022-11-13T12:23:16+5:302022-11-13T12:24:46+5:30
ॲपलची नवीन प्रोडक्ट सर्वांना आकर्षित करत आहेत.
नवी दिल्ली : ॲपलच्या नव्या प्रोडक्टच्या साहाय्याने लोक आपल्या हरवलेल्या वस्तू शोधू शकतात. ॲपलचा Air Tag यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. आता याबाबतीत आणखी एक महत्त्वाचे फिचर समोर आले आहे. यामध्ये सांगण्यात आले की, ॲपलच्या एअरटॅगच्या मदतीने एका महिलेला तिचा कुत्रा शोधण्यात मदत झाली आहे. AppleInsider च्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडामध्ये एक कुत्रा पळून गेल्याच्या तासाभरानंतर त्याची मालक डेनिसला याची माहिती मिळाली. ती कचरा टाकण्यासाठी गेली असता कुत्रा बेपत्ता झाला असल्याची माहिती संबंधित महिलेने दिली. ती बाहेर गेली असतानाच कुत्रा पळून गेला असावा असे तिला वाटत होते.
कुत्र्याच्या कॉलरवर होता एअरटॅग
कुत्रा बेपत्ता झाल्याचे कळताच ती चिंतेत पडली. मात्र नंतर तिला आठवले की तिने कुत्र्याच्या कॉलरला एअरटॅग लावले होते. ॲपलचा हा एअरटॅग जीपीएस ट्रॅकरसह येतो. जेव्हा त्याने कुत्र्याचा पाठलाग केला तेव्हा बेपत्ता कुत्रा घरापासून २० मिनिटांच्या अंतरावर होता.
हे डिव्हाइस यापूर्वीही वापरात आले आहे
खरं तर ॲपलच्या एअरटॅगच्या मदतीने एखाद्याचा शोध घेण्याची ही पहिली वेळ नाही. लक्षणीय बाब म्हणजे हे डिव्हाइस केवळ याच उद्देशासाठी तयार करण्यात आले होते. अलीकडेच ॲपल एअरटॅगच्या मदतीने चोरीला गेलेली कारही शोधण्यात आली होती. माहितीनुसार, या ट्रॅकिंग डिव्हाइसमुळे या वर्षी जूनमध्ये एक व्यक्तीला कॅनडामध्ये चोरीला गेलेली रेंज रोव्हर गाडी सापडली होती. SUVच्या मालकाने गाडीला तीन एअरटॅग जोडले होते. त्यामुळे कारचा सहजपणे शोध लावण्यात आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच कार जप्त केली. यापूर्वी देखील ही कार चोरीला गेली होती म्हणून गाडीच्या मालकाने तीन एअरटॅग जोडले होते. पहिल्यांदा चोरी झाली तेव्हा केवळ एक एअरटॅग होते जे चोरट्याने काढले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"