सरकारने ब्लॉक केले तरीही चॅटिंग शक्य; व्हॉट्सॲपचे नवे फीचर, नववर्षाचे गिफ्ट, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:14 AM2023-01-09T09:14:40+5:302023-01-09T09:15:00+5:30

नववर्षात व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे.

In the new year, WhatsApp has introduced a new feature for users. | सरकारने ब्लॉक केले तरीही चॅटिंग शक्य; व्हॉट्सॲपचे नवे फीचर, नववर्षाचे गिफ्ट, जाणून घ्या...

सरकारने ब्लॉक केले तरीही चॅटिंग शक्य; व्हॉट्सॲपचे नवे फीचर, नववर्षाचे गिफ्ट, जाणून घ्या...

Next

कॅलिफोर्निया : नववर्षात व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणले आहे. आता इंटरनेट शटडाऊन किंवा सेन्सॉरशिपच्या माध्यमातून ॲपच्या सेवा बंद करण्यात आल्यावरही व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ राहता येईल किंवा चॅटिंग करता येईल. व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने जगभरातील वापरकर्त्यांसाठी प्रॉक्सी सर्व्हर सपोर्टची घोषणा केली आहे. याद्वारे, सरकारने विशिष्ट क्षेत्रात व्हॉट्सॲपची सेवा ब्लॉक केल्यानंतरही वापरकर्त्यांना या ॲपची सेवा मिळत राहील. 

गोपनीयतेचे काय?

प्रॉक्सी सर्व्हर वापरून पाठवल्या जाणाऱ्या संदेशांची गोपनीयता राखली जाईल, सर्व मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील, असे मेटाने म्हटले आहे. प्रॉक्सी सर्व्हरद्वारे कनेक्शन स्थापित केल्यानंतरही वापरकर्त्याला व्हॉट्सॲपकडून उच्च पातळीची गोपनीयता आणि सुरक्षा मिळेल.

कधी वापर करावा? : जेव्हा व्हॉट्सॲपशी कनेक्ट करण्यात अक्षम असाल तेव्हाच प्रॉक्सी सर्व्हर वापरावे. कारण तुमचा आयपी पत्ता प्रॉक्सी प्रदात्याला (व्हॉट्सॲपला नाही) दिसू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

कसा करायचा वापर?

  • सर्वप्रथम व्हॉट्सॲप अपडेट करा
  • सेटिंग्स पर्याय निवडा. 
  • स्टोअरेज अँड डेटा पर्यायावर टॅप करा. 
  • प्रॉक्सी सेटिंग पर्याय निवडा.
  • यूज प्रॉक्सी हा पर्याय सुरू करा.
  • सेटअप प्रॉक्सी निवडा, प्रॉक्सी ॲड्रेस टाकून सेव्ह करा.
  • कनेक्शन झाल्यावर हिरवा चेकमार्क दिसेल.

Web Title: In the new year, WhatsApp has introduced a new feature for users.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.