Income from YouTube Trick: असेल हरी...! काहीच न करता युट्यूबवर लाखो रुपये कमवताहेत लोक; ही ट्रीक येतेय कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 05:34 PM2022-02-19T17:34:05+5:302022-02-19T17:34:34+5:30
Income from YouTube Trick: सुरुवातीला लोकांना ओरिजिनल कंटेंट टाकावा लागत होता. त्यासाठी त्यांना तासंतास डोके लढवावे लागत होते, कष्ट करावे लागत होते, तसेच पैसेही खर्च करावे लागायचे. परंतू आता लोकांच्या हाती एक भन्नाट ट्रीक सापडली आहे.
आजकाल युट्यूबवर लोक काही ना काही व्हिडीओ टाकून लाखो रुपये कमवत आहेत. एका युट्यूबरने तर काल तो सात मिनिटांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता, असा दावा केला आहे. परंतू यासाठी या लोकांना युट्यूबवर काही ना काही बनवून व्हिडीओ पोस्ट करावे लागतात, त्यातून सबस्क्रायबर्स मिळवायचे आणि व्ह्यूव्हज आले की पैसे मिळतात. परंतू अशी एक ट्रीक आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या कॅमेराने व्हिडीओ बनविण्याचे कष्ट न घेताही लाखोंची कमाई करू शकता.
सुरुवातीला लोकांना ओरिजिनल कंटेंट टाकावा लागत होता. त्यासाठी त्यांना तासंतास डोके लढवावे लागत होते, कष्ट करावे लागत होते, तसेच पैसेही खर्च करावे लागायचे. परंतू आता लोकांच्या हाती एक भन्नाट ट्रीक सापडली आहे. यामुळे पैसेही खर्च करावे लागत नाहीत की बाहेर राब राब राबावे लागत नाही, आपोआप पैसे अकाऊंटमध्ये येऊ लागतात. अशा प्रकारे पैसे कमविणारे बरेच लोक आहेत, बरं का...
जर तुम्हाला यूट्यूबवर कमाई करायची असेल, तर तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी एक चॅनेल तयार करावे लागेल. आता तुम्हाला त्या अनोख्या विषयाशी संबंधित व्हिडिओ तुमच्या चॅनलवर पोस्ट करावा लागेल. तसेच व्हिडिओ ओरिजिनल असावा म्हणजे तो इतर कोणाचाही कॉपी केलेला नसावा. संगीत किंवा दृश्य कॉपी करू नये. जर तुमची सामग्री इतरांपेक्षा वेगळी असेल तर तुम्हाला अधिक व्हूवज मिळतात. ज्यानंतर तुमच्या सदस्यांची संख्या वाढू लागते आणि जसजसे सदस्य वाढतात तसतसे तुमचे व्ह्यू देखील वाढतात. जेव्हा तुमचे व्हिडीओ आणि तुमची सदस्य संख्या YouTube निकषांशी जुळते तेव्हा तुमचे खाते पैसे कमविण्यासाठी तयार होते.
हे खाते तयार झाले की तुम्ही व्हिडीओ टाकला की कमाई सुरु होईल. परंतू याला वर सांगितल्याप्रमाणे खूप खटपटी असतात. आता नवीन ट्रीक पहा.
यूट्यूबवर असे काही लोक आहेत जे केवळ व्हिडिओ बनवून कमाई करत आहेत परंतु हा व्हिडिओ त्यांचा नाही. लोक अनेक मूळ व्हिडिओंमधून लहान क्लिपिंग्ज घेतात आणि त्यांना त्यांच्या स्वत:च्या आवाजाने किंवा त्यांच्या अद्वितीय संगीताने YouTube वरील त्यांच्या चॅनेलवर अपलोड करतात. अशा परिस्थितीत, YouTube त्यांना मूळ व्हिडिओंप्रमाणे मोजते आणि पैसे अदा करते. हे सोपे आहे की नाही...