पाकिस्तानाचा 4जी इंटरनेट स्पीड भारतापेक्षा दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 12:21 PM2018-02-22T12:21:28+5:302018-02-22T12:42:39+5:30
भारत 4जी इंटरनेट स्पीडमध्ये दुनियाभरात 88 देशांनी मागे आहे.
मुंबई- डिजिटल इंडिया बनविण्यासाठी सतत प्रयत्न केले जातं आहेत. पण डिजिटल इंडिया बनविण्यासाठी काही पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्याशिवाय हे शक्य होणार नाही. डिजिटलायजेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे इंटरनेट स्पीड. पण भारत इंटरनेट स्पीडच्या बाबतीत खूप मागे आहे. भारत 4जी इंटरनेट स्पीडमध्ये दुनियाभरात 88 देशांनी मागे आहे. 4 जी स्पीडमध्ये पाकिस्तान भारताच्या खूप पुढे असल्याचं समोर आलं आहे. ‘ओपनसिग्नल’ या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात ही बाब समोर आली आहे. ६ खंडातील जवळपास ८८ देशांतील ४जी डाऊनलोड स्पीडची चाचणी केल्यानंतर भारत देश खूप मागे असल्याचं समोर आलं आहे.
भारतात 4 जी इंटरनेटता एव्हरेज स्पीड 6mbps आहे. तर पाकिस्तानचा 4 जी स्पीड 14 mbps आहे. ओपनसिग्नलच्या सर्हेक्षणानुसार सिंगापूरचा इंटरनेट स्पीड 44 mbpc आहे. नेदरलँडमध्ये 4जी इंटरनेट स्पीड 42 mbps आहे तर नोव्हेमध्ये 41mbps व साऊथ कोरियामध्ये 40mbps इंटरनेट स्पीड आहे. हंगरीमध्ये इंटरनेट 4जी स्पीड 39 mbps आहे. पण भारताचा इंटरनेट 4जी स्पीड पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया या देशांपेक्षाही कमी आहे.
युएईमध्ये इंटरनेट 4जी स्पीड 28mbps आहे. जापानमध्ये 25mbps, युकेमध्ये 23mbps इंटरनेट स्पीड आहे. अमेरिकेचा 4जी इंटरनेट स्पीड भारतापेक्षा अडीचपटीने जास्त आहे. रूसमध्ये 15Mbps, अल्जेरिया इंटरनेट 4जी स्पीड भारताच्या दीडपटीने जास्त आहे. ओपनसिग्नलनुसार हा डेटा 1 ऑक्टोबर 2017 ते 29 डिसेंबर 2017 पर्यंतचा आहे.
या रिपोर्टमध्ये धिम्या इंटरनेट स्पीडसाठी नेटवर्क क्षमतेला जबाबदार धरलं आहे. याशिवाय भारतातील मोठं 4जी नेटवर्कही यामागील कारण आहे. भारतात 4जी इंटरनेट जवळपास 86 टक्के लोकं वापरतात. दूरसंचार सचिव अरूण सुंदरराजन यांच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागात इंटरनेट युजर्सला इंटरनेट स्पीड कमी मिळतो आहे. यावर सरकारकडून लक्ष दिलं जातं आहे. जीओने संपूर्ण भारतात 4जी इंटरनेट सेवा सुरू केली आहे. एअरटेलही भारतभर सेवा देतं आहे. तर आयडिया दिल्ली आणि कोलकाता वगळून संपूर्ण देशात 4 जी इंटरनेट सुविधा देतं आहे. तर व्होडाफोनही कंपनी 17 सर्कल्समध्ये 4जी सेवा पुरविते आहे.