5 जी नेटवर्क रोलआऊटमध्ये भारत जगात अव्वल, असा घेता येईल लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 03:36 PM2023-04-18T15:36:20+5:302023-04-18T15:40:33+5:30
भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे.
जगभरात इंटरनेट सेवा आता अधिक सुलभ आणि वेगवान झाला आहे. त्यात भारतही सर्वात पुढे आहे. भारत ५ जी सेवा नेटवर्क रोलआऊटमध्ये सर्वात पुढे आला आहे. केंद्रीयमंत्री देवूसिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ५ जी रोलआऊट करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात सर्वात अव्वल देश आहे. भारतात प्रतिदिन ३ जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात येत आहे. त्यानुसार, भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे.
५ जी नेटवर्कमुळे होणार फायदे
एका अहवालानुसार जगात सर्वात स्वस्त मोबाईल डेटा पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यासह, भारताने स्वदेशी ४ जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. मंत्रीमहोदयांनी सांगितले की, ५ जी नेटवर्कच्या मदतीने लाईट माइल हार्ड स्पीड कनेक्टीव्हीटीच्या ताकद मिळते. त्यासोबतच, डिजिटल सर्वेक्षण असं की, हेल्थ, एग्रीकल्चर क्षेत्रालाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
किती शहरात पोहोचलं ५ जी नेटवर्क
५ जी रोलआऊटसंदर्भात विचार केल्यास, भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल द्वारे ५ जी सेवा रोलआऊट करण्यात येत आहे. रिलायन्स जिओने आत्तापर्यंत एकूण ४०६ शहरांमध्ये True 5 G नेटवर्क रोलआऊट करण्यात आले आहे. तर, एअरटेलच्यावतीने आत्तापर्यंत २६५ पेक्षा अधिक जिल्ह्यात ५ जी नेटवर्क रोलाऊट करण्यात आले आहे. एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांकडून युजर्संना अनलिमिटेड ५ जी सर्व्हीस ऑफर केली जात आहे.
५ जी फ्री डेटाचा फायदा कसा घ्याल
एअरटेलच्या ५ जी सेवेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २३९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. ही एक इनवाइड बेस्ड सिस्टीम आहे, ज्याला Airtel Thanks App ने एक्सेस केले जाऊ शकतो. एअरटेलप्रमाणेच जिओ ५ जी नेटवर्कही २३९ रुपयांचा रिचार्च करावा लागणार आहे.