देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 03:17 PM2023-10-08T15:17:43+5:302023-10-08T15:18:17+5:30

भारतात 5G ची सुरुवात झाली आहे, पण लवकरच 6G सुरू होण्याची अपेक्षा आहे.

india-will-have-6g-by-2030-before-5g-become-popular | देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

देशभरात 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यापूर्वीच येईल 6G; सरकारने सुरू केली तयारी

googlenewsNext


भारतात 5G तंत्रज्ञान आले आहे, अनेक शहरांमध्ये Jio आणि Airtel ची 5G सेवा सुरू झाली आहे. देशातील लोकही हळुहळू 5G कडे वळत आहेत. आता लवकरच देशात 6G सुरू होऊ शकते. भारत सरकारने हास स्पीड 6G सेवा आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 5G तंत्रज्ञान लोकप्रिय होण्यापूर्वीच देशात 6G सुरू हो शकते.

रिलायन्स जिओ आणि एअरटेलने देशात 5G कनेक्शन देणे सुरू केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये लोकांना 5G कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे. परंतू, आता भारताने 6G आणण्याची तयारी सुरू केली आहे. सुपर हाय स्पीड वायरलेस ब्रॉडबँड तंत्रज्ञान भारतात येईल. भारतात व्यावसायिक वापरासाठी हे जवळजवळ तयार आहे, परंतु संपूर्ण देशभरात पोहोचण्यास थोडा वेळ लागेल. 2030 पर्यंत लोकांसाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

6G ची खासियत म्हणजे, हे वेगवान ब्रॉडबँड स्पीड देईल. याचे नेटवर्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे चालवले जाईल. यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार वेग आणि नेटवर्क मिळेल. 5G तंत्रज्ञानापेक्षा 100 पट अधिक गती देणारे हे नेटवर्क असेल. यावर तुम्ही अनेक चित्रपट काही सेकंदात डाउनलोड करू शकाल.

6G मध्ये काय मिळेल?
तुम्हाला 5G मध्ये 1 Gbps चा स्पीड मिळत असेल, तर 6G मध्ये 100 Gbps स्पीड मिळेल. बफरिंग टाइम 5G मध्ये 1 मिलीसेकंद असेल, तर 6G मध्ये तो 1 मायक्रो सेकंद असेल. 5G सध्या स्मार्ट शहरे, स्मार्ट कारखाने, स्मार्ट फार्म आणि रोबोटिक्स क्षेत्रात कार्यक्षमता वाढविण्यात मदत करत आहे. 6G तंत्रज्ञान याच्याही एक पाऊल पुढे असेल. हे सर्व प्रकारच्या स्पेक्ट्रम बँडला सपोर्ट करेल. 

Web Title: india-will-have-6g-by-2030-before-5g-become-popular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.