भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 06:50 PM2024-10-16T18:50:54+5:302024-10-16T18:51:48+5:30
6G in India: भारतात 6G तंत्रज्ञान आणण्याबाबत जोरदार तयारी सुरू आहे. इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ही माहिती दिली.
6G in India : सर्वात वेगवान 5G रोलआउटनंतर भारतात 6G ची तयारी सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या 8 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 6G तंत्रज्ञानाबाबत मोठे भाष्य केले. सरकारने दावा केला की, भारत 6G टेक्नॉलॉजी आणण्यात संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल. 6G तंत्रज्ञान आणणारा पहिला देश आपण व्हावे, अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे.
Our 6G must be
— DoT India (@DoT_India) October 16, 2024
🌍 FOR ALL
🤝 INCLUSIVE
🌐 ACCESSIBLE
💸 AFFORDABLE pic.twitter.com/A6xgoteoGd
भारत 6G चे नेतृत्व करेल
इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) द्वारे आयोजित WTSA मध्ये केंद्रीय मंत्री सिंधियांनी भारतातील 6G च्या शक्यतांबद्दल स्पष्टपणे भाष्य केले. ते म्हणाले की, भारत 5G आणि 4G मध्ये आघाडीवर आहे आणि आता 6G मध्येही आघाडीवर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे आम्ही पालन करत आहोत. 6G ची सुरुवात करणारा भारत पहिला देश व्हावा, अशी पंतप्रधान मोदींची इच्छा आहे.
दूरसंचार क्षेत्रातील समस्या दूर होतील
यादरम्यान केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की, भारतातील 6G प्रत्येकासाठी परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असायला हवे. आपला देश इंडिया 6G अलायन्ससोबत 10 टक्के पेटंट मिळवेल. यामुळेच 6G चे मार्केट लीडर होण्यासाठी दूरसंचार कायदा, 2023 मध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतातील दूरसंचार क्षेत्रातील समस्या सोडवण्याचा सरकार विचार करत आहे. दरम्यान, यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एअरटेलच्या सॅटेलाइट कम्युनिकेशनचा वापर करून दुर्गम भागात तैनात असलेल्या सैनिकांशी व्हिडिओ कॉलही केला.
जुड़ता भारत, विकसित भारत! 🇮🇳
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) October 15, 2024
आज, #IMC2024 की प्रदर्शनी में @airtelindia की Satellite Communication सुविधा के माध्यम से नागालैंड, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड और हिमाचल प्रदेश के सीमावर्ती क्षेत्रों में तैनात जवानों से बातचीत की और सभी देशवासियों की ओर से उनके साहस, सेवा और समर्पण… pic.twitter.com/oPlurptJO2
सॅटेलाईट कम्युनिकेशन येणार?
भारतात लवकरच सॅटेलाइट कम्युनिकेशन लॉन्च केले जाऊ शकते. सरकार सायबर सुरक्षेवर भर देत असून डिजिटल कम्युनिकेशनमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील दूरसंचार क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे. आगामी काळात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे Airtel, BSNL, Jio, Vodafone-Idea युजर्सना 6G ची भेट सर्वप्रथम मिळेल, असेही सिंधिया यावेळी म्हणाले.