'अभिनंदन' यांचा व्हिडीओ गेम ठरला सुपरहिट; बेस्ट गेमसाठी गुगलने केलं नॉमिनेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 01:37 PM2019-11-19T13:37:26+5:302019-11-19T13:42:39+5:30
गुगलने भारतीय हवाई दलाच्या Indian Air Force: A Cut Above ला Best Game-2019 च्या 'युजर्स चॉईस गेम' च्या कॅटेगिरीत नॉमिनेट केलं आहे.
नवी दिल्ली - गुगलनेभारतीय हवाई दलाच्या Indian Air Force: A Cut Above ला Best Game-2019 च्या 'युजर्स चॉईस गेम' च्या कॅटेगिरीत नॉमिनेट केलं आहे. व्हिडीओ गेमला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेबाबत हवाई दलानेही आनंद व्यक्त केला आहे. हवाई दलाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून युजर्सना आपल्या या 3D गेमला विजयी करण्यासाठी वोट करण्याचं आवाहन केलं आहे. मताधिक्यानुसार युजर्स चॉईस गेम कॅटेगिरीचा किताब पटकावता येणार आहे.
भारतीय हवाई दलाने 31 जुलै रोजी हा गेम लाँच केला आहे. हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या हस्ते हा गेम लाँच करण्यात आला. हा गेम Android आणि iOS या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर खेळता येऊ शकतो. हवाई दलाने याचा टीझर 20 जुलैलाच रिलीझ केला होता. टीझरमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांना दाखवण्यात आले होते. तसेच या गेममध्ये युजर्स स्वत: पायलट असतील आणि विमानाचे सर्व कंट्रोल म्हणजेच ऑन-स्क्रीन बटण युजर्सकडे असतील. तसेच गेमच्या सुरुवातीला ट्रेनिंग सेशन देखील आहे. यामध्ये एअरक्राफ्ट कसे चालवायचे याची माहिती देण्यात आली आहे.
IAF's Video game- 'Indian Air Force: A Cut Above' has been selected by #Google to compete for 'Best Game-2019' in 'Users Choice Game' category.
— Indian Air Force (@IAF_MCC) November 19, 2019
To vote, click https://t.co/wBJSYuxRgf
Or
Go to Play Store - Users Choice Game - Select IAF game & VOTE.#LetsPlay#iafmobilegamepic.twitter.com/eEGaCT1nTe
व्हिडीओ गेम सध्या तरी एकच जण खेळू शकतो, पण लवकरच हा गेम एकाच वेळी अनेक जण खेळू शकतील, असा मल्टिप्लेअर मोड जोडला जाणार आहे. हा गेम केवळ मोबाईलसाठी तयार करण्यात आला आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. गेममध्ये प्रशिक्षण, सिंगल प्लेअर आणि फ्री फ्लाईटचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गेममध्ये राफेल विमानांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राफेल सोबतच सुखोई 30 MKI विमानांचाही समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्ताननेही एफ - 16 विमानांनी हवाई हल्ला केला, पण भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतावून लावत पाकिस्तानचं एफ - 16 विमान पाडलं. या मोहिमेचा हिरो विंग कमांडर अभिनंदन ठरला होता. आता हवाई दलाने तयार केलेल्या या गेममुळे तुम्ही काल्पनिक मिग-21 विमान उडवू शकणार आहात.