Video : भारतीय हॅकरने केवळ 10 मिनिटांत इन्स्टाग्राम हॅक केले; 20 लाख जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 10:23 AM2019-07-16T10:23:55+5:302019-07-16T10:24:47+5:30

हॅकेथॉनद्वारे या कंपन्या त्यांच्या अॅप्लिकेशनमधील कमतरता शोधून काढतात

Indian hacker hacked Instagram in just 10 minutes; Wins 2 million | Video : भारतीय हॅकरने केवळ 10 मिनिटांत इन्स्टाग्राम हॅक केले; 20 लाख जिंकले

Video : भारतीय हॅकरने केवळ 10 मिनिटांत इन्स्टाग्राम हॅक केले; 20 लाख जिंकले

Next

कॉम्प्युटरचा शोध जरी परदेशात लागला असला तरीही भारतीयांनी या क्षेत्रामध्ये जगाला मागे सोडले आहे. तंत्रज्ञानावरील भारतीयांचे प्रभुत्व हे सर्वज्ञात आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्यामध्ये भारतीय हॅकरना गलेलठ्ठ पगारही दिले जातात. मात्र, अनेकदा कंपन्या त्यांच्या वेबसाईटस, अॅप्लिकेशन सुरक्षित करण्यासाठी हॅकेथॉन आयोजित करतात. 


हॅकेथॉनद्वारे या कंपन्या त्यांच्या अॅप्लिकेशनमधील कमतरता शोधून काढतात. अशीच एक त्रूटी भारतीय हॅकरने इन्स्टाग्रॅमला अवघ्या 10 मिनिटांत दाखवून दिली. या त्रूटीद्वारे हा हॅकर कोणाच्याही अकाऊंटमध्ये शिरकाव करू शकत होता. या त्याच्या शोधाबद्दल इन्स्टाग्रामने त्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. 


या हॅकरचे नाव लक्ष्मण मुथैया आहे. तो तामिळनाडूचा राहणारा असून कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे. लक्ष्मणने हॅकिंगचा व्हिडीओही पुरावा म्हणून दिला आहे, यामुळे फेसबुकने त्याला 30 हजार डॉलर म्हणजेच 20.55 लाख रुपये दिले आहेत. 


इन्स्टाग्राममध्ये काय होती त्रूटी
इन्स्टाग्राममध्ये पासवर्ड रिकव्हरीमध्ये ही त्रूटी होती. यानिसार कोणताही हॅकर पासवर्ड रिसेट करत कोणाचेही अकाऊंट हॅक करू शकत होता. पासवर्ड रिसेट करायचा असल्यास त्या युजरच्या मोबाईलवर 6 आकडी कोड जातो. यामध्येच ही त्रूटी सापडली. लक्ष्मणने याचा शोध लावण्यासाठी वेगवेगळ्या आयपी अॅड्रेसपासून हजारावर रिक्वेस्ट पाठविले होते. यानंतर फेसबुकने ही त्रूटी दूर केली आहे. 

Web Title: Indian hacker hacked Instagram in just 10 minutes; Wins 2 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.