आता समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट तुम्हाला ओळखणं शक्य होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 02:42 PM2018-04-07T14:42:20+5:302018-04-07T14:42:20+5:30

Indian-origin researcher develops device that lets others hear words you’re thinking | आता समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट तुम्हाला ओळखणं शक्य होणार

आता समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट तुम्हाला ओळखणं शक्य होणार

Next

नवी दिल्ली- सिनेमागृहात सिनेमा बघत असताना आवाज न करता व इतरांना त्रास न देता आता गप्पा मारणं किंवा एकमेकांच्या मनातील ओळखणं शक्य होणार आहे. भारतीय वंशाचा मॅस्सचूसिट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (एमआयटी) रिसर्चरने एक असं डिवाइस विकसित केलं आहे ज्यामुळे तुम्हाला एकही शब्द न बोलता समोरच्यापर्यंत तुमचं म्हणणं पोहचवू शकता. तुम्हाला काय बोलायचं आहे किंवा समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं आहे ते न बोलता समजणार आहे. म्हणजेच समोरची व्यक्ती किंवा तुम्ही काय विचार करत आहात ते या डिव्हाइसमुळे समजेल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
अर्णव कपूर असं या रिसर्चरचं नाव असून त्याने अल्टरइगो (AlterEgo) नावाचं एक हेडसेट बनवलं आहे. हे हेडसेट कुठल्याही प्रकारे तुमच्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टी समजू शकत नाही, त्यामुळे घाबरायचं कारण नाही, असं एमआयटीने स्पष्ट केलं आहे. तुमच्या विचारांना वाचण्याची क्षमता या डिव्हाइसमध्ये नाही. यामुळे तुमच्या प्रायव्हसीला काहीही धोका नसल्याचंही एमआयटीने स्पष्ट केलं आहे. अल्टरइगो हा हेडसेट एका कानात टाकता येईल.तुमच्या हनुवटीला लागून स्पिकर, अशा प्रकारची रचना करण्यात आली आहे. 
अल्टरइगो हे डिव्हाइस सबवोकॅलिसेशन्सच्या आधारे चालतं. म्हणजेच तुम्गी जेव्हा एखाद्या शब्दाचा डोक्यात विचार करता तेव्हा त्या शब्दाच्या जबड्यात लहान व अदृश्य हालचाली होतात, त्यालाच सबवोकॅलिसेशन्स म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती मनातल्या मनात एखादा शब्द किंवा वाक्य बोलेल त्याचवेळी चेहऱ्याच्या खालचा भाग व मानेच्या भागावर संवेदना उत्पन्न होतात. अल्टरइगो हे हेडसेट त्याचं संवेदनांना वाचण्याचं काम करणार आहे. 
या डिव्हाइजने सिग्नल पकडल्यावर ज्या कॉम्युटरमध्ये या डिव्हाइजची सिस्टम बसविली असेल ते सिग्नलला शब्दात बदलेल. हवेतील साऊंड वेव्सत्या मदतीने साधारण शब्द अल्टरइगो सांगणार नाही. व्यक्तीच्या जबड्याद्वारे थेट शब्द पोहचविले जातील. अनेक देशात अशा प्रकारचं हेडसेट्स सैन्यात वापरले जातात. आता काही कंपन्या हे हेडसेट्स लाइफस्टाइल गॅजेट म्हणून विकत आहेत. 
या तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे याद्वारे आवाज न करता वॉइस कम्युनिकेशन सोप्या पद्धतीने होईल. उदाहरण- एखाद्या फॅक्टरीमध्ये जिथे खूप आवाज असतो. अशा ठिकाणी अल्टरइगो वापरल्यास ओरडून बोलायची गरज भासणार नाही. 
 

Web Title: Indian-origin researcher develops device that lets others hear words you’re thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.