भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 02:38 PM2023-03-08T14:38:19+5:302023-03-08T14:39:42+5:30

सैन्याच्या गुप्तचर संस्थांनी ही अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. यामध्ये चीनच्या ११ कंपन्यांचे फोन वापरणे धोकादायक असून ते लवकरात लवकर बदलावेत असे म्हटले आहे.

Indian soldiers will have to get Apple, Samsung, Micromax phones; Advisory issued by intelligence agencies against 11 china smartphone companies | भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी

भारतीय सैनिकांना अ‍ॅप्पल, सॅमसंग, मायक्रोमॅक्सचे फोन घ्यावे लागणार; गुप्तचर यंत्रणांची अ‍ॅडवायझरी जारी

googlenewsNext

एलएसीवर आजही तणावाचे वातावरण असून चीनच्या अ‍ॅप्सविरोधात भारत सरकारने आधीच कठोर पाऊल उचलले होते. आता भारतीय सैन्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर चिनी कंपन्यांचे मोबाईल बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

सैन्याच्या गुप्तचर संस्थांनी ही अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. यामध्ये चीनच्या ११ कंपन्यांचे फोन वापरणे धोकादायक असून ते लवकरात लवकर बदलावेत असे म्हटले आहे. या ब्रँडमध्ये वनप्लस, ओप्पो, व्हिवो, रिअलमी, रेडमी सारख्या कंपन्या आहेत. 

वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांना गुप्तचर संस्थांनी ही अ‍ॅडव्हायजरी पाठविली आहे. यामध्ये सैनिक चिनी कंपन्यांचे मोबाईल वापरणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले आहे. भारताचे शत्रू असलेल्या देशांच्या कंपन्यांकडून फोन विकत घेण्यापासून किंवा वापरण्यापासून सैनिकांना व त्यांच्या कुटुंबाला परावृत्त करावे, असे यंत्रणांनी म्हटले आहे. 

या चिनी कंपन्यांच्या फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. चिनी कंपन्यांच्या फोनमध्ये हे सापडले आहेत, असे एनएआयला सुत्रांनी सांगितले आहे. यापूर्वीही गुप्तचर यंत्रणांनी लष्करी कर्मचाऱ्यांच्या फोनवरून असे अनेक संशयास्पद अ‍ॅप्लिकेशन काढून टाकले आहेत. 

Web Title: Indian soldiers will have to get Apple, Samsung, Micromax phones; Advisory issued by intelligence agencies against 11 china smartphone companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.