भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 10:02 AM2017-09-07T10:02:39+5:302017-09-07T13:09:25+5:30
भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात.
बंगळुरू, दि. 7- भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. मोबाईलमधील अॅपच्या वापरावर खर्च होणारे चार तास म्हणजे सर्वसामान्य लोक करत असलेल्या आठ तासांच्या ड्युटीच्या निम्मा वेळ आहे. भारतात अनेक नोकरीच्या ठिकाणी आठ तासांची शिफ्ट असते. अॅप्लिकेशनचं विश्लेषण करणारी संस्था अॅप अॅनीच्या मे 2017 मधील अभ्यासानुसार, अॅन्ड्रॉइड फोनमधील अॅपवर जास्त वेळ घालविणाऱ्यांच्या संख्येत भारत देश टॉप पाचमध्ये होता. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
भारतात एन्ड्रॉइड अॅपवर सगळ्यात जास्त सक्रिय असणारी वीस टक्के लोक आहेत. साऊथ कोरीया, मेक्सिको, ब्राझील आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो. क्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझिल आणि जपानच्या टॉप २० टक्के अँड्रॉइड युजर्सनंतर भारताच्या टॉप २० टक्के सर्वाधिक अॅक्टिव्ह अँड्रॉइड युजर्सचा क्रमांक लागतो. साऊथ कोरीया, मेक्सिको, ब्राझील आणि जपानमधील मोबाईल अॅपचा सर्वात जास्त वापर करणारे युजर्स दिवसातील पाच तास अॅप्सच्या वापरावर खर्च करतात.
विशेष म्हणजे भारतात मोबाईल अॅपचा जास्त वापर न करणारे युजर्सही दिवसातील दीड तास मोबाईलच्या वापरावर खर्च करतात. तसंच अति जास्त वापर आणि कमी वापर यांच्यामधील टप्प्यात येणारे युजर्स दिवसातील अडीच तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात.
लोकांच्या सध्याच्या जीवनशैलीत फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर महत्त्वाचा झाला आहे. तसंच या अॅपचा लोकांनी पटकन अवलंब केला असल्याचं,अॅप अॅनीने अहवालात म्हंटलं आहे. अॅप अॅनीने त्यांच्या सर्व्हेसाठी एन्ड्रॉइड वापरणाऱ्या दहा मोठ्या देशांचा अभ्यास केला.
शॉपिंग अॅप्लिकेशन, ट्रॅव्हल आणि गेम यावर सगळ्यात जास्त वेळ खर्ची केला जातो. याच अॅपवर सरासरी वेळ घालविण्यात भारतीयांचा दुसरा क्रमांक होता. मोबाईल शॉपिंगवर प्रत्येक महिन्याला प्रत्येक युजर दिवसाला जवळपास 90 मिनीटं वेळ घालवतो. दक्षिण कोरीयातील लोक यामध्ये काही प्रमाणात पुढे असून 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल शॉपिंगवर घालवितात. तर फायनान्स अॅपवर भारतीय सरासरी अर्धा तासांचा वेळ दर महिन्याला घालवतात. ब्राझिलमधील लोक 45 मिनीटं तर दक्षिण कोरीयातील लोका एक तासांचा वेळ फायनान्स अॅपवर घालवतात.