भारतीय स्टार्टअपची कमाल! ८० सेकंदात कपडे धुणार वॉशिंगमशीन; पाणी आणि डिटर्जंटचीही गरज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 02:32 PM2022-07-21T14:32:42+5:302022-07-21T14:34:32+5:30

80 wash washing machine: वॉशिंगमशीनमुळे कपडे धुणं सोपं झालं. पण आजच्या घडीला फुली ऑटोमॅटीक वॉशिंगमशीन विकत घेणं प्रत्येकालाच परवडेल असं नाही.

indian startup 80 wash built a waterless and no detergent washing machine | भारतीय स्टार्टअपची कमाल! ८० सेकंदात कपडे धुणार वॉशिंगमशीन; पाणी आणि डिटर्जंटचीही गरज नाही!

भारतीय स्टार्टअपची कमाल! ८० सेकंदात कपडे धुणार वॉशिंगमशीन; पाणी आणि डिटर्जंटचीही गरज नाही!

Next

80 wash washing machine: वॉशिंगमशीनमुळे कपडे धुणं सोपं झालं. पण आजच्या घडीला फुली ऑटोमॅटीक वॉशिंगमशीन विकत घेणं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. तसंच वॉशिंगमशीनमध्ये पाण्याचाही अपव्यय होतो आणि वीजेचंही बिल वाढतं. जिथं अनेक ठिकाणी लोक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहेत आणि शहरी भागात मात्र बेसुमारपणा पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. 

वॉशिंगमशीनमध्ये कपडे धुणं खूप सोयीचं असलं तरी आता बाजारात उपलब्ध असलेले डिटर्जंट पावडरही प्रचंड केमिकल मिश्रीत असतात. त्यामुळे कपड्यांची हानी होते. तसंच त्वचेचेही रोग निर्माण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यावर एका भारतीय स्टार्टअप कंपनीनं तोडगा काढला आहे. कंपनीनं नाव 80 वॉश असं आहे. कंपनीनं ८० सेकंदात कपडे स्वच्छ करणारी अनोखी वॉशिंगमशीन तयार केली आहे. 

80Wash नं बनवली वॉटरलेस वॉशींगमशीन
चंदीगढच्या 80Wash कंपनीनं दोन अडचणी सोडवण्यावर भर दिला आहे. पहिलं म्हणजे ऑटोमॅटीक वॉशींगमध्ये बेसुमावर खर्च होत असलेलं पाणी आणि दुसरं म्हणजे डिटर्जंटच्या नावावर वापरले जाणारे केमिकल्स. 

रुबल गुप्ता, नितीन कुमार सलूजा आणि विरेंद्र सिंह यांनी आपल्या स्टार्टअप 80Wash ची सुरुवात केली. यात त्यांनी ८० सेकंदात कपडे स्वच्छ करू शकेल अशी मशीन तयार केली आहे. पण यात सफाईची वेळ (स्पिन टाइम) कपडे आणि त्यावर असलेल्या डागांच्या हिशोबानं वाढवता देखील येते. 

नेमकं तंत्रज्ञान काय?
अनोख्या वॉशींगमशीनमध्ये मेटल कम्पोनेंट आणि पीपीई कीट देखील स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्हाला काही मिनिटं आणि फक्त थोडसं पाणी खर्च करावं लागेल. ही वॉशींग मशीन ISP स्टीम टेक्नोलॉजीवर आधारित आहे. ज्यात बॅक्टेरिया लो फ्रिक्वेंन्सी रेडियो फ्रिक्वेंन्सीच्या सहाय्यानं मारले जातात. 

अशाच पद्धतीनं मशीन कपड्यांवरील डाग, धूळ आणि रंगही स्वच्छ करू शकते. यासाठी रुम टेम्परेचरवर ड्राय स्टीम जनरेटरचा वापर केला जातो. सिंगल सायकलमध्ये तुम्ही ८० सेकंदात जवळपास ५ कपडे अवघ्या अर्धा कप पाण्यात स्वच्छ धुवून काढू शकता. 

दोन पर्यायात उपलब्ध आहे मशीन
स्टार्टअप कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार या वॉशींगमशीनमध्ये डिटर्जंटची गरज भासत नाही. जास्त डाग असतील तर मशीनची धुलाई सायकल वाढवली जाते. मशीन दोन पर्यायात उपलब्ध आहे. यात पहिला पर्याय 7-8KG आहे. तर दुसरा पर्याय ७० ते ८० किलोच्या मॉडलचा आहे. यात ५० कपड्यांना स्वच्छ करण्याची क्षमता आहे. यात फक्त ५ ते ६ ग्लास पाणी खर्च होईल. 

पायलट प्रोजेक्ट
सध्या ही वॉशींग मशीन पायलट प्रोजेक्टमध्ये आहेत. स्टार्टअपनं चंदीगढ, पंचकुला आणि मोहालीच्या हॉटेल्स तसंच हॉस्पीटलसह एकूण ७ ठिकाणी वापरण्यात येत आहे. 80Wash कंपनीनं सध्या यूज मॉडलवर याचं काम सुरू केलं आहे. 

कंपनी यासाठी २०० रुपये दरमहा सब्सक्रिप्शन देत आहे. यात अनलिमिटेड कपडे धुतले जाऊ शकतात. स्टार्टअपला पंजाब आणि हरियाणा सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.

Web Title: indian startup 80 wash built a waterless and no detergent washing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.