इकडे 5G साठी रडके तोंड! चीन, अमेरिकेत 1000 Gbps स्पीडच्या 6G ची चाहूल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 10:14 PM2021-02-11T22:14:48+5:302021-02-11T22:20:09+5:30
Indians waiting for 5G till 2022: चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रांसमिशनसाठी एअरवेव्हजच्या टेस्टिंगसाठी एक सॅटेलाईट देखील लाँच केल्याचे अहवालात म्हटले आहे.
भारतात 5G नेटवर्क लाँचिंग दूर, त्यासाठी साधी चर्चा सुरु झालेली नाहीय. तर दुसरीकडे भारताचा कट्टर विरोधक बनलेल्या चीन आणि मित्रदेश अमेरिकेत 6G लाँच करण्याची तयारी सुरु झाली आहे. चीन तर गेल्या मोठ्या काळापासून 6G वर काम करत आगे. चीनच्या हुवाई कंपनीचे 6G रिसर्च सेंटर कॅनडामध्ये आहे. तिथे हे तंत्रज्ञान जवळपास विकसित होत आले आहे. (Indians have to wait till 2022 for 5G.)
महत्वाचे म्हणजे, चीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रांसमिशनसाठी एअरवेव्हजच्या टेस्टिंगसाठी एक सॅटेलाईट देखील लाँच केल्याचे अहवालात म्हटले आहे. आता चीनची कंपनी ZTE ने देखील यूनिकॉम हॉन्ग-कॉन्गसोबत मिळून 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतात 2021 च्या अखेरीस 5जी च्या स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीने तसा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतात 2022 मध्ये सुरुवातीला काही लोकांसाठी तर नंतर इतरांसाठी 5जी लाँच केले जाणार आहे. रिलायन्स जिओने तर यंदा जुलैपासून 5जीची ट्रायल घेण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जिओला हे वर्ष थांबावे लागण्याची शक्यता आहे.
Apple, सॅमसंग, Xiaomi नाही, लोकांचा या स्मार्टफोन ब्रँडवर विश्वास; नाव वाचून धक्का बसेल
अमेरिका आणि चीनमध्ये पहिले 6जी कोण लाँच करणार यावर स्पर्धा रंगली आहे. जेव्हा अमेरिकेत ट्रम्प सरकार होती, तेव्हाच 6जीवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अमेरिकेत द अलायंस फॉर टेलीकम्युनिकेशन्स इंडस्ट्री सोल्यूशन्स ATIS ची स्थापना करण्यात आली. 6जी तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी अमेरिकेने Apple, AT&T, Qualcomm, Google आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या तंत्रज्ञांना कामाला लावले आहे.
मस्तच! 5G स्मार्टफोनसाठी स्वदेशी कंपनीची जोरदार तयारी; Micromax चीनी कंपन्यांना पडणार भारी
एवढेच नाही तर युरोपीय संघाने गेल्या वर्षी नोकियाच्या नेतृत्वात 6G वायरलेस प्रोजेक्ट सुरु केला आहे. यामध्ये Ericsson AB आणि Telefonica SA सोबत काही विद्यापीठेही कामाला लागली आहेत. ज्या देशाला पहिले यश मिळेल त्यालाच 6जी चे फायदे मिळणार आहेत. कारण पेटंट त्या देशाच्या नावावर होणार आहे. यामुळे जगात 6जी साठी मोठी स्पर्धा लागली आहे. मात्र, आपण भारतीय अद्यापही 5जी येणार की नाही, याबाबत साशंक आहोत.
मुकेश अंबानी Reliance Jioच्याच 4G मायाजालात गुरफटले; 5G वर सरकारचे मोठे वक्तव्य