विमान प्रवासावेळी फिजिकल पासपोर्ट सोबत ठेवण्याची गरज नाही, लवकरच लाँच होणार E-Passport
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:09 PM2022-01-21T18:09:55+5:302022-01-21T18:14:25+5:30
E Passport : परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी सांगितले की, नवीन ई-पासपोर्ट देखील आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICSO) मानकांनुसार बनवला जाईल.
नवी दिल्ली : भारतात लवकरच मायक्रोचिप आधारित ई-पासपोर्ट सादर केला जाऊ शकतो. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवीन ई-पासपोर्ट रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) आणि बायोमेट्रिक्सच्या वापराअंतर्गत बनवला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी सांगितले की, नवीन ई-पासपोर्ट देखील आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICSO) मानकांनुसार बनवला जाईल. ई-पासपोर्ट सिक्योरिटी फीचर्समध्ये एक जॅकेट देखील समाविष्ट असेल, ज्यामध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप असते ज्यावर महत्त्वपूर्ण डेटा एन्कोडेड केलेला असतो.
दरम्यान, नवा पासपोर्ट इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे बनवला जाईल, असे सांगण्यात येत आहे. चिप-इनेबल्ड ई-पासपोर्टमध्ये अनेक एडवांस्ड सिक्योरिटी फीचर्स प्रदान केले जाऊ शकतात. अर्जदारांना त्यांची वैयक्तिक माहिती जसे की त्यांचा बायोमेट्रिक डेटा, नाव, पत्ता आणि इतर महत्त्वाचे ओळखपत्र सादर करावे लागतील. ही माहिती एम्बेडेड चिपमध्ये डिजिटल पद्धतीने साइन्ड आणि स्टोर्ड केली जाईल.
काही समस्या असल्यास, सिस्टम ते शोधून काढेल आणि पासपोर्ट पडताळणी अयशस्वी होईल. नवीन ई-पासपोर्टमध्ये सिक्योरिटी फीचर्स देखील असतील, जे रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे अनधिकृत डेटा ट्रान्सफरवर प्रतिबंध करतील. ट्विटरवर ही माहिती देण्यात आली आहे.
या स्मार्ट ई-पासपोर्टसह, भारत 150 देशांच्या लिस्टमध्ये सामील होईल ज्यात यूके, जर्मनी, बांग्लादेश आणि बायोमेट्रिक पासपोर्ट जारी करणाऱ्या इतरांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांसाठी बायोमेट्रिक पासपोर्ट विकसित होत आहेत. परंतु देशाने जारी केलेले राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट 2008 पासून बायोमेट्रिकली सुरक्षित आहेत. दरम्यान, पहिला ई-पासपोर्ट तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना जारी करण्यात आला होता.