भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन लाँच; जाणून घ्या Moto G 5G ची किंमत आणि फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 09:13 AM2020-12-01T09:13:43+5:302020-12-01T09:18:16+5:30
Motorola Moto G 5G Launch: हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे.
आधी अमेरिकेची आणि नंतर चीनच्या लिनोवोने ताब्यात घेतलेली जगातील बहुतांश पेंटंट नावावर असलेली कंपनी मोटरोलाने (Motorola) ५जी च्या बाजारात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला असून वनप्लसच्या नॉर्डला किंमत आणि फिचर्सच्या बाबतीत कडवी टक्कर देणार आहे.
Moto G 5G हा फोन ७ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन पहिला युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आल्याने चांगलेच प्राईस वॉर रंगणार आहे.
Moto G 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या लाँच करताच डिस्काऊंट देण्यात येत असून हा फोन चार हजार रुपयांनी स्वस्त विकला जाणार आहे. याचबरोबर एसबीआय किंवा अॅक्सिस बँकेचे कार्ड वापरल्यास त्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तर एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच पहिल्याच सेलमध्ये 19,999 रुपयांना हा फोन मिळणार आहे. Moto G 5G हा फोन वॉल्कैनिक ग्रे आणि फ्रॉस्टेड सिल्वर रंगामध्ये उपलब्ध आहे.
Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच
स्पेसिफिकेशन्स
मोटो जी 5जी अँड्रॉईड १० वर चालतो. यामध्ये 6.7 इंच फुल एचडी+ (1080x2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले देण्यात आला आहे. 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी वाढविता येते.
कॅमेरा
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल वाइड-अँगल व तिसरा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
सुरक्षा
मोटो जी 5G ला डस्ट प्रोटेक्शन IP52 देण्यात आले आहे. मागे फिंगरप्रिंट सेंन्सर आहे. 5000mAh ची बॅटरी जी 20 वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ही बॅटरी दोन दिवस येते असा दावा कंपनीचा आहे. या फोनचे वजन 212 ग्रॅम आहे.