5G नंतर भारताचं पुढच पाऊल! इंटरनेट सेवा आता थेट अंतराळातून मिळणार, तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 02:17 PM2022-10-19T14:17:59+5:302022-10-19T14:24:41+5:30

भारतात नुकतीच 5G इंटरनेट सेवा लाँच झाली आहे. सध्या ही सेवा काही शहरामध्ये सुरू झाली आहे. आता देशभरात 5G च्या स्पीडने इंटरनेट मिळणार आहे.

India's next step after 5G Internet service will now be available directly from space | 5G नंतर भारताचं पुढच पाऊल! इंटरनेट सेवा आता थेट अंतराळातून मिळणार, तयारी सुरू

5G नंतर भारताचं पुढच पाऊल! इंटरनेट सेवा आता थेट अंतराळातून मिळणार, तयारी सुरू

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतात नुकतीच 5G इंटरनेट सेवा लाँच झाली आहे. सध्या ही सेवा काही शहरामध्ये सुरू झाली आहे. आता देशभरात 5G च्या स्पीडने इंटरनेट मिळणार आहे. या पार्श्वभूमिवर आता टेलिकॉम कंपन्या एका नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत, ही सेवा सुरू झाल्यास देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी देता येणार आहे. उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवेवर कंपन्या काम करत आहेत.

एलॉन मस्कची स्टारलिंक कंपनी जगभरातील अनेक देशांमध्ये आपली उपग्रह इंटरनेट सेवा देत आहे. आता ही कंपनी भारतातही सेवा देण्याच्या विचारात आहे. तेसच जिओ आणि एअरटेल देखील ही सेवा देण्याच्या तयारीत आहेत.

केवळ १०१ रुपयांत घरी घेऊन जा Vivo चा स्मार्टफोन; दिवाळीनिमित्त जबरदस्त ऑफर

यावरती या कंपन्या काम करत आहेत. ही सेवा लवकरच सुरू होऊ शकते, असं बोलले जात आहे. भारती एअरटेल आणि Hughes या कंपन्यांनी संयुक्त उपक्रम वन वेब आणि जियो सॅटेलाईट कॉम्युनिकेशन भारतात त्यांची उपग्रह सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. एलॉन मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनी सध्या काही देशात ही सेवा देत आहे, आता ही कंपनी भारतात सेवा देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भातील परवान्यासाठी या कंपनीने अर्ज केला आहे. 

सॅटेलाइट इंटरनेटचा फायदा काय?

देशातील दुर्गम भागात अजुनही इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. अगदी दुर्गम आणि ग्रामीण भागातही सॅटेलाईट इंटरनेटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवली जाऊ शकते. यामध्ये युजर्ंसना फायबर आणि सेल टॉवर्सपेक्षा खूप सोपी कनेक्टिव्हिटी मिळते. त्याच्या मदतीने, ज्या भागात फायबर आणि सेल टॉवर सेवा पोहोचलेली नाही अशा ठिकाणीही सेवा पोहोचू शकते. 

इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या उपग्रहांना इंटरनेट सिग्नल पाठवतात, त्या रिसीव्हरच्या मदतीने वापरकर्त्यांपर्यंत पोहोचतात. रिसीव्हर किंवा डिश मोडेमशी जोडलेले असतात, जे तुमच्या काँप्युटरशी किंवा इतर उपकरणांशी कनेक्ट असतात. ज्याप्रमाणे तुमच्या घरातील टीव्हीवर सिग्नल पोहोचवले जाते त्याच पध्दतीने इंटरनेट सेवा या तंत्रक्षानातून पाठवली जाते .

Web Title: India's next step after 5G Internet service will now be available directly from space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.