मिनिटांत चार्ज होईल हा फोन; 160W फास्‍ट चार्जिंगसह ‘ही’ कंपनी आणणार प्रीमियम स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 12:34 PM2021-06-18T12:34:37+5:302021-06-18T13:48:50+5:30

Infinix 160W charging: इनफिनिक्स लवकरच 160w चार्जिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन सादर करू शकते, हा फोन प्रीमियम कॅटेगरीत सादर केला जाऊ शकतो.  

Infinix 160w charging smartphone renders leak show design  | मिनिटांत चार्ज होईल हा फोन; 160W फास्‍ट चार्जिंगसह ‘ही’ कंपनी आणणार प्रीमियम स्मार्टफोन 

मिनिटांत चार्ज होईल हा फोन; 160W फास्‍ट चार्जिंगसह ‘ही’ कंपनी आणणार प्रीमियम स्मार्टफोन 

Next

लो बजेट स्मार्टफोन बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली इनफिनिक्स कंपनी आता मार्ग बदलणार आहे. कंपनी लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते, जो 160 वॉट अल्ट्रा फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलजीसह सादर केला जाईल. XDA Developers ने या फोनची माहिती दिली आहे आणि डिजाइन रेंडरर्स देखील लीक केले आहेत. हा कथित Infinix स्मार्टफोन कंपनीच्या इतर फोन्सपेक्षा खूप वेगळा आहे. (Infinix may launch 160W fast charging smartphone with NOW branding) 

Infinix च्या आगामी फोनची डिजाइन 

डिजाइन रेंडरर्सनुसार, हा एक प्रीमियम फोन असू शकतो. यात बेजललेस डिजाइन असलेला कर्व्ड डिस्प्ले आहे. फोनमधील डिस्प्लेच्या वरच्या आणि खालच्या बाजूस देखील खूप कमी बेजल दिसत आहेत. यात वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात होल-पंच कॅमेरा कटआउट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. खालच्या बाजूला स्पीकर ग्रिल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. पावर आणि वॉल्यूम बटन्स उजवीकडे देण्यात आले आहेत.  

इनफिनिक्सच्या या फोनच्या मागे मोठ्या अक्षरांत ‘नाऊ’ अशी ब्रॅंडिंग आहे. त्याचबरोबर एक आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. या मॉड्यूलमध्ये मोठे कॅमेरा तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिसत आहे. या आगामी फोनचे नाव काय असेल याची माहिती मात्र समोर आली नाही, तसेच किंमत किती असेल हे देखील आता सांगता येणार नाही.  

Web Title: Infinix 160w charging smartphone renders leak show design 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.