5000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix 5A भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Published: August 2, 2021 12:58 PM2021-08-02T12:58:46+5:302021-08-02T12:59:27+5:30

स्वस्तात Infinix 5A स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी आणि MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे.  

Infinix 5a launched in india with 5000mah battery mediatek helio a20 processor  | 5000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix 5A भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

5000mAh बॅटरीसह स्वस्त Infinix 5A भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Next

गेले काही दिवस लिक्स आणि बातम्यांमधून समोर आल्यानंतर आज Infinix ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Smart 5A लाँच केला आहे. वॉटर ड्रॉप नॉच, मोठी बॅटरी आणि कमी किंमत असलेला हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर उपलब्ध होईल. Infinix 5A स्मार्टफोन भारतात 6,499 रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा फोन 9 ऑगस्टपासून Flipkart वरून विकत घेता येईल.  

Infinix 5A चे स्पेसिफिकेशन्स  

Infinix 5A स्मार्टफोनमध्ये कंपनीने 1560×720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.52 इंचाचा एचडी+ एलसीडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशियो 20:9 आणि स्क्रीन टू बॉडी रेशियो 90.5% आहे. स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Helio A20 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते. 

Infinix 5A मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. हा एक 8MP Dual AI रियर कॅमेरा आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश देखील मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा स्वस्त स्मार्टफोन Android 11 आधारित Android GO ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. सुरक्षेच्या दृष्टीने या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळते. Infinix 5A मध्ये कंपनीने 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 

Web Title: Infinix 5a launched in india with 5000mah battery mediatek helio a20 processor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.