जबरदस्त! फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणार हा स्मार्टफोन; रियलमी-शाओमीला टाकले मागे 

By सिद्धेश जाधव | Published: June 29, 2021 02:53 PM2021-06-29T14:53:06+5:302021-06-29T14:54:07+5:30

Infinix Concept Phone 2021: Infinix च्या या कॉन्सेप्ट फोनचे खासियत म्हणजे यात मिळणारी 160W चार्जिंग टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला फोन 0 ते 100% फक्त 10 मिनिटांत चार्ज होईल.

Infinix concept phone 2021 supports 160w fast charging unveiled at mwc 2021  | जबरदस्त! फक्त 10 मिनिटांत फुल चार्ज होणार हा स्मार्टफोन; रियलमी-शाओमीला टाकले मागे 

Infinix Concept Phone 2021

googlenewsNext

Infinix ची ओळख बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन लाँच करणारी कंपनी अशी आहे. परंतु आता कंपनीने एक हायएन्ड स्मार्टफोन जगासमोर ठेवला आहे. Infinix ने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2021 (MWC 2021) मध्ये एक Concept Phone 2021 सादर केला आहे. बऱ्याचदा Concept फोन्स बाजारात उपलब्ध होत नाहीत, हे फोन्स कंपन्या आपली क्षमता दाखवण्यासाठी प्रदर्शनात ठेवतात. Infinix Concept Phone 2021 देखील बाजारात उपलब्ध होईल कि नाही याची माहिती कंपनीने दिलेली नाही.  

Infinix च्या या कॉन्सेप्ट फोनचे खासियत म्हणजे यात मिळणारी 160W चार्जिंग टेक्नॉलॉजी. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला फोन 0 ते 100% फक्त 10 मिनिटांत चार्ज होईल, असा दावा Infinix ने कला आहे.  

Infinix Concept Phone 2021 ची वैशिष्ट्ये 

Infinix Concept Phone 2021 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या साइड फ्रेममध्ये कोणताही बटण दिसत नाही. या कॉन्सेप्ट स्मार्टफोनच्या रियर पॅनलमध्ये कलर बदलणारी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जेव्हा फोन चार्ज केला जातो तेव्हा बॅक पॅनल चमकू लागतो. Infinix Concept Phone 2021 मधील 20 टेम्परेचर सेन्सर या फोनचे टेम्परेचर 40 डिग्री सेल्सियस राखण्याचे काम करतात.  

या फोनमधील फोटोग्राफी सेगमेंट देखील तितकाच खास आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमधील इतर सेन्सर्सची माहिती मिळाली नाही परंतु, फोनच्या मागे 8 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स देण्यात आली आहे. ही लेन्स 60x जूमला सपोर्ट करते.  

Web Title: Infinix concept phone 2021 supports 160w fast charging unveiled at mwc 2021 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.