8999 रुपयांमध्ये 5,000mAh ची बॅटरी असलेला नवाकोरा Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन लाँच
By सिद्धेश जाधव | Published: April 15, 2022 03:05 PM2022-04-15T15:05:55+5:302022-04-15T15:06:05+5:30
Infinix HOT 11 2022 भारतात 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि Android 11 सह आला आहे.
Infinix ब्रँड अंतर्गत नवीन लो बजेट स्मार्टफोन सादर केला जाणार आहे, अशी बातमी जानेवारीमध्ये आली होती. त्यानुसार आज कंपनीनं Infinix HOT 11 2022 स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा मोबाईल फोन RAM, UniSoc T610 चिपसेट, 13MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी, अशा स्पेक्ससह भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे.
Infinix HOT 11 2022 चे स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स हॉट 11 2022 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक डॉट-नॉच डिस्प्ले आहे जो 550निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्क्रीनला पांडा किंग ग्लासची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह UniSoc T610 चिपसेट मिळतो. सोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर मिळतो. फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह येतो. Infinix HOT 11 2022 मध्ये बेसिक बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी यातील 5,000एमएएच बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Infinix HOT 11 2022 ची किंमत
Infinix HOT 11 2022 चा एकमेव 4GB रॅम आणि 64GB मॉडेल भारतात आला आहे. ज्याची किंमत कंपनीनं 8,999 रुपये ठेवली आहे. हा फोन 22 एप्रिलपासून विकत घेता येईल. त्यासाठी तुम्हाला Polar Black, Sunset Gold आणि Aurora Green असे तीन कलर व्हेरिएंटमधून एकाची निवड करावी लागेल.