बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; दोन स्वस्त स्मार्टफोन्स लाँचपूर्वी वेबसाईटवर लिस्ट
By सिद्धेश जाधव | Published: August 31, 2021 12:31 PM2021-08-31T12:31:52+5:302021-08-31T12:34:24+5:30
Infinix Hot 11 and Hot 11S Listing: Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S स्मार्टफोन्स नुकतेच Google Play Console वर लिस्ट करण्यात आले आहेत.
रियलमी आणि रेडमी आपले बजेट स्मार्टफोन्स बाजारात आणण्यास सज्ज झाल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या आगामी स्वस्त स्मार्टफोन्सच्या बातम्या येत आहेत. आता Infinix चे दोन स्वस्त स्मार्टफोन भारतात येणार असल्याची बातमी आली आहे. कंपनी Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S हे दोन स्मार्टफोन्स पुढील महिन्यात देशात सादर केले जाऊ शकतात. यातील Helio G88 SoC सह येणाऱ्या Infinix Hot 11S स्मार्टफोनची माहिती कंपनीने दिली आहे. या स्मार्टफोन्ससह Infinix Hot 11 देखील भारतात येऊ शकतो.
Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S स्मार्टफोन्स नुकतेच Google Play Console वर लिस्ट करण्यात आले आहेत. या लिस्टिंगमधून या डिव्हिसेसच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे, तसेच काही स्पेसिफिकेशन्स देखील समजले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लाँचची अचूक तारीख समजली नाही. परंतु पुढील महिन्यात हे फोन्स भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. तसेच या फोन्सची किंमत 10 हजारांच्या आसपास असू शकते.
Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Google Play कंसोल लिस्टिंगनुसार, Infinix Hot 11 मध्ये वाटर-ड्रॉप नॉच असलेला फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी Infinix Hot 11 मध्ये Helio G70 चिपसेट मिळू शकतो. ज्याला 4GB रॅम आणि Android 11 ची जोड देण्यात येईल.
Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिजाईन देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Helio G88 SoC असल्याचे रिपोर्ट्समधून समजले होते. परंतु Google Play कंसोलवर हा फोन Helio G70 आणि 4GB रॅमसह लिस्ट झाला आहे. Hot 11S मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज 6GB रॅम देण्यात येईल, असे Infinix सांगितले होते.