एकच नंबर! तब्बल 2 महिने चालणार या स्वस्त स्मार्टफोनची बॅटरी; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: November 15, 2021 06:11 PM2021-11-15T18:11:48+5:302021-11-15T18:13:01+5:30
New Phone Under 10000 Infinix Hot 11 Play: Infinix Hot 11 Play नावाचा नवीन फोन 6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.
Infinix अशी स्मार्टफोन कंपनी आहे जी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर करते. कमी किंमतीत देखील हे स्मार्टफोन ‘व्हॅल्यू फॉर मनी’ स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येतात. असेच 4 फोन कंपनीने आता आपल्या ‘नोट 11’ सीरीज अंतगर्त सादर केले आहेत. त्याचबरोबर कंपनीने जागतिक बाजारात अजून एक नवीन फोन Infinix Hot 11 Play नावाने सादर केला आहे, ज्यात 6000mAh ची अवाढव्य बॅटरी देण्यात आली आहे.
Infinix Hot 11 Play चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Hot 11 Play स्मार्टफोन 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीने या फोनला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेटची ताकद दिली आहे. त्याचबरोबर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देखील देण्यात आली आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डने वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह एक्सओएस 7.6 युआयवर चालतो.
फोटोग्राफीसाठी इनफिनिक्स हॉट 11 प्ले मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स मिळते. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर असलेले हा फोन 6,000एमएएचची मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी सिंगल चार्जवर 55 दिवसांचा स्टँडबाय टाईम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
Infinix Hot 11 Play ची किंमत
Infinix Hot 11 Play चा एकच व्हेरिएंट आफ्रिकन बाजारात उतरवण्यात आला आहे. ज्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळते. या फोनची किंमत 130 अमेरिकन डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. जी 9,700 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Exploratory Blue, Haze Green, Polar Black आणि Sunset Gold कलरमध्ये खरेदी करता येईल.