8,499 रुपयांमध्ये 7GB रॅम असलेला स्मार्टफोन; बजेटमधील सर्वात फास्ट फोनचा पहिला सेल
By सिद्धेश जाधव | Published: May 30, 2022 09:58 AM2022-05-30T09:58:31+5:302022-05-30T09:58:42+5:30
7GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 6000mAh बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा असलेला Infinix Hot 12 Play स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Infinix Hot 12 Play स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला होता. हा या सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. आज अर्थात 30 मे, 2022 रोजी या डिवाइसची विक्री सुरु होणार आहे. फोनमध्ये 7GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 6000mAh बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
किंमत
Infinix Hot 12 Play स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. ज्यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. कंपनीनं या स्मार्टफोनची किंमत 8,499 रुपये ठेवली आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा डेलाईट ग्रीन, होरायजन ब्लू आणि रेसिंग ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.
Infinix Hot 12 Play चे स्पेसिफिकेशन
Infinix Hot 12 Play मध्ये 6.82 इंचाचा HD+ आयपीएस टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720x1612 पिक्सल रिजोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस लेटेस्ट Android 12 आधारित XOS 1.6 UI वर चालतो. यात Helio G35 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 3GB व्हर्च्युअल रॅम असा एकूण 11GB RAM देण्यात आला आहे. यातील 64GB बिल्ट स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
कॅमेरा सेगमेंट पाहता, या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेकंडरी AI सेन्सर क्वॉड एलईडी फ्लॅशसह मागे देण्यात आला आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. या ड्युअल सिम फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाईप सी-पोर्ट आणि हेडफोन जॅकसह रीरी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते. ही बॅटरी तीन दिवसांचा स्टँडबाय टाइम देते.