Budget Laptop: पुढील आठवड्यात येतायत दोन बजेट फ्रेंडली लॅपटॉप; Inbook X1 आणि Inbook X1 Pro होणार भारतात लाँच
By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 03:44 PM2021-12-01T15:44:11+5:302021-12-01T15:44:56+5:30
Budget Laptop: Inbook X1 आणि Inbook X1 Pro हे दोन लॅपटॉप Flipkart च्या माध्यमातून खरेदी करता येतील. दोन्ही लॅपटॉप लेटेस्ट Windows 11 सपोर्टसह सादर केले जातील.
Infinix Inbook X1 लॅपटॉप सीरिज भारतात 8 डिसेंबरला येत आहे या सीरिज अंतर्गत लेटेस्ट Windows 11 सपोर्ट असलेले दोन लॅपटॉप सादर केले जातील. कंपनी Inbook X1 आणि Inbook X1 Pro हे दोन लॅपटॉप ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकणार आहे. आता कंपनीनं या लॅपटॉपच्या किंमतीचा खुलासा केला आहे.
Inbook X1 आणि Inbook X1 Pro या लॅपटॉप्सची किंमत 30,000 ते 40,000 रुपयांच्या दरम्यान असेल. या लॅपटॉप्समध्ये 512 GB स्टोरेज आणि 16GB पर्यंतचा RAM मिळेल. यात एयरक्राफ्ट ग्रेड अल्युमिनियमची फिनिश देण्यात येईल, असं देखील फ्लिपकार्टवर सांगण्यात आलं आहे.
Infinix Inbook X1
Infinix Inbook X1 हा कंपनीचा पहिला लॅपटॉप असेल जो Windows 11 ओएससह सादर केला जाईल. या लॅपटॉपमध्ये Intel Core i3, Core i5 आणि Core i7 असे प्रोसेसरचे ऑप्शन मिळतील. कंपनीने सांगितले आहे कि या लॅपटॉपचे वजन 1.48 किलोग्राम आणि थिकनेस 16.3mm असेल. हा डिवाइस एयरक्राफ्ट ग्रेड अॅल्युमिनियम फिनिशसह सादर केला जाईल.
इनफिनिक्सच्या आगामी लॅपटॉपमध्ये 55Whr ची बॅटरी देण्यात येईल. ही बॅटरी 13 तासांचा प्ले बॅक टाईम देईल, असे कंपनीने सांगितले आहे. हा डिवाइस फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. या लॅपटॉपचे ऑरोरा ग्रीन, नोबल रेड आणि स्टारफॉल ग्रे असे तीन कलर व्हेरिएंट खरेदीसाठी उपलब्ध होतील. Infinix Inbook X1 मध्ये याआधी आलेल्या Inbook X1 Pro सारखे बरेचशे फीचर्स मिळू शकतात.
Infinix Inbook X1 Pro
Infinix Inbook X1 Pro मध्ये 1920x1080 पिक्सल रेजॉलूशन असलेला 14 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 300 नीटस पीक ब्राईटनेस आणि 178 डिग्री व्यूइंग अँगलला सपोर्ट करतो. या प्रो व्हेरिएंटमधील 55 Whr ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाईप-C पोर्ट मिळतो. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये यूएसबी टाइप-C पोर्ट, दोन यूएसबी 3.0 पोर्ट, एक यूएसबी 2.0 पोर्ट, एक HDMI पोर्ट, एक 3.5mm जॅक आणि एसडी कार्ड रीडर देण्यात आला आहे.