Budget Laptop: फक्त 6000 रुपयांमध्ये घरी आणा हा भारी लॅपटॉप; Intel प्रोसेसरसह मिळतोय Windows 11 सपोर्ट
By सिद्धेश जाधव | Published: December 15, 2021 07:36 PM2021-12-15T19:36:10+5:302021-12-15T19:36:30+5:30
Budget Laptop: Infinix नं आपली InBook X1 सीरीज काही दिवसांपूर्वी भारतात सादर केली होती. या सीरिज अंतगर्त Infinix InBook X1, InBook X1 Pro असे दोन लॅपटॉप तीन प्रोसेसर व्हेरिएंटसह सादर करण्यात आले आहेत.
Infinix नं आपली InBook X1 सीरीज काही दिवसांपूर्वी भारतात सादर केली होती. या सीरिज अंतगर्त Infinix InBook X1, InBook X1 Pro असे दोन लॅपटॉप तीन प्रोसेसर व्हेरिएंटसह सादर करण्यात आले आहेत. आजपासून Infinix InBook X1 खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टवरून हा लॅपटॉप फक्त 6000 दरमहा नो-कॉस्ट ईएमआय विकत घेऊ शकतात.
Infinix InBook X1, InBook X1 Pro Price In India
InBook X1 लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात Intel Core i3 प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. तर 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसह येणारा Intel Core i5 व्हेरिएंट 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. InBook X1 Pro लॅपटॉप Intel Core i7, 16GB RAM आणि 512GB SSD सह 55,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हा लॅपटॉप रेड, ब्लू आणि ग्रे कलरमध्ये जपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. हा लॅपटॉप विकत घेताना आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एसबीआय कार्ड तसेच मोबिक्विक अॅमेक्स नेटवर्क कार्डच्या पहिल्या ट्रँजॅक्शनवर 20 टक्के सूट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.
फ्लिपकार्टनं हा लॅपटॉप No cost EMI विकत घेण्याची संधी देखील दिली आहे. या ऑफर अंतर्गत i3 व्हेरिएंटसाठी 6000 रुपयांचा दरमहा ईएमआय ठेवण्यात आला आहे. तर i5 व्हेरिएंट दर महिन्यला 7667 रुपये देऊन घरी आणता येईल. मोठ्या i7 व्हेरिएंटसाठी मात्र महिन्याला 9334 रुपये द्यावे लागतील.
InBook X1 चे स्पेसिफिकेशन्स
Infinix InBook X1 मध्ये 14-इंचाचा full-HD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात Intel Core i3-1005G1 आणि Core i5-1035G1 असे दोन प्रोसेसरचे ऑप्शन मिळतात. ज्यात अनुक्रमे 8GB RAM व 256GB SSD आणि 8GB RAM व 512GB SSD स्टोरेज मिळते. हा लॅपटॉप लॅपटॉप Windows 11 Home वर चालतो.
Infinix InBook X1 मध्ये HD (720p) वेबकॅम आहे. कनेक्टिविटीसाठी एक USB 2.0 पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, दोन USB टाइप-सी पोर्ट्स, एक HDMI 1.4 आणि एक 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. तसेच हा डिवाइस Wi-Fi 802.11ac आणि Bluetooth v5.1 सह येतो. यातील 55Wh ची बॅटरी 65W Power Delivery (PD) चार्जिंगला सपोर्ट करते.
Infinix InBook X1 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Infinix InBook X1 Pro मध्ये Intel Core i7-1065G7 प्रोसेसर आहे. सोबत 16GB RAM आणि 512GB SSD स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच या डिवाइसमध्ये कंपनीने 55Wh ची बॅटरी मिळते, जी 65W चार्जिंगला सपोर्ट करते. यातील इतर स्पेक्स InBook X1 सारखेच आहेत.
हे देखील वाचा:
Android Tips: सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय
एक नव्हे तर दोन शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह येणार Vivo चे स्मार्टफोन; पुढील आठवड्यात होणार लाँच