Laptop For Students: Windows 11 सपोर्टसह कमी किंमतीत आले दोन जबराट लॅपटॉप; जाणून घ्या Infinix InBook X1 ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: December 8, 2021 03:11 PM2021-12-08T15:11:21+5:302021-12-08T15:11:42+5:30

Laptop For Students Infinix InBook X1 Price: इनफिनिक्सनं आपली पहिली लॅपटॉप सीरीज भारतात लाँच केली आहे. या सीरिज अंतर्गत Infinix InBook X1 आणि Infinix InBook X1 Pro हे दोन लॅपटॉप सादर करण्यात आले आहेत.

Infinix inbook x1 price rs 35999 and infinix inbook x1 pro price rs 55999 launch in india could be best laptop for students  | Laptop For Students: Windows 11 सपोर्टसह कमी किंमतीत आले दोन जबराट लॅपटॉप; जाणून घ्या Infinix InBook X1 ची वैशिष्ट्ये 

Laptop For Students: Windows 11 सपोर्टसह कमी किंमतीत आले दोन जबराट लॅपटॉप; जाणून घ्या Infinix InBook X1 ची वैशिष्ट्ये 

googlenewsNext

Infinix InBook X1 सीरीज भारतात लाँच झाली आहे. या सीरीजमध्ये InBook X1 आणि InBook X1 Pro हे दोन लॅपटॉप सादर करण्यात आले आहेत. या बेस मॉडेल Intel Core i3 आणि Core i5 अशा दोन प्रोसेसर ऑप्शनसह विकत घेता येईल. तर InBook X1 Pro फक्त Intel Core i7 प्रोसेसरसह उपलब्ध झाला आहे. या लॅपटॉप्समध्ये 8GB पर्यंतचा RAM, Windows 11 आणि 512GB पर्यंतची वेगवान SSD स्टोरेज मिळते.  

Infinix InBook X1, InBook X1 Pro Price In India 

InBook X1 लॅपटॉपच्या बेस मॉडेलची किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात Intel Core i3 प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB SSD स्टोरेज मिळते. तर 8GB RAM आणि 512GB SSD स्टोरेजसह येणारा Intel Core i5 व्हेरिएंट 45,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. InBook X1 Pro लॅपटॉप Intel Core i7, 16GB RAM आणि 512GB SSD सह 55,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

InBook X1 चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix InBook X1 मध्ये 14-इंचाचा full-HD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. यात Intel Core i3-1005G1 आणि Core i5-1035G1 असे दोन प्रोसेसरचे ऑप्शन मिळतात. ज्यात अनुक्रमे 8GB RAM व 256GB SSD आणि 8GB RAM व 512GB SSD स्टोरेज मिळते. हा लॅपटॉप लॅपटॉप Windows 11 Home वर चालतो.  

Infinix InBook X1 मध्ये HD (720p) वेबकॅम आहे. कनेक्टिविटीसाठी एक USB 2.0 पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, दोन USB टाइप-सी पोर्ट्स, एक HDMI 1.4 आणि एक 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. तसेच हा डिवाइस Wi-Fi 802.11ac आणि Bluetooth v5.1 सह येतो. यातील 55Wh ची बॅटरी 65W Power Delivery (PD) चार्जिंगला सपोर्ट करते. 

Infinix InBook X1 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix InBook X1 Pro मध्ये Intel Core i7-1065G7 प्रोसेसर आहे. सोबत 16GB RAM  आणि 512GB SSD स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच या डिवाइसमध्ये कंपनीने 55Wh ची बॅटरी मिळते, जी 65W चार्जिंगला सपोर्ट करते. यातील इतर स्पेक्स InBook X1 सारखेच आहेत.  

Web Title: Infinix inbook x1 price rs 35999 and infinix inbook x1 pro price rs 55999 launch in india could be best laptop for students 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.