30 हजारांच्या आत Windows 11 असलेला शानदार लॅपटॉप; 16GB RAM सह 10th जेनेरेशन Intel प्रोसेसर
By सिद्धेश जाधव | Published: January 18, 2022 03:01 PM2022-01-18T15:01:30+5:302022-01-18T15:02:11+5:30
Infinix InBook X2 सीरिज 16GB RAM, 512GB Storage, Windows 11 आणि 10th Gen Intel प्रोसेसरसह बजेटमध्ये सादर करण्यात आली आहे.
Infinix आपल्या आता Infinix InBook X2 रेंज कोणताही गाजावाजा न करता सादर केली आहे. ही गेल्यावर्षी आलेल्या सीरिजचा अपग्रेड आहेत. यात 10th Gen Intel Core i7, Core i5 आणि Core i3 प्रोसेसरसह 16GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. कंपनीनं तीन लॅपटॉप बाजारात आणले असून तिन्हीमध्ये विंडोज 11 सपोर्ट मिळतो. चला जाणून घेऊया यांची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
सह सादर केला गेला आहे. इनफिनिक्स का यह लॅपटॉप 14-इंच full-HD IPS डिस्प्लेसह सादर केला गेला आहे, ज्याची मॅक्सिमम ब्राईटनेस 300 आहे. इसके साथ ही Infinix InBook X2 मध्ये 512GB पर्यंत की स्टोरेज देण्यात आली आहे. यहां हम तुम्हाला इनफिनिक्स के लेटेस्ट लॅपटॉप बाबत डिटेल मध्ये माहिती दे रहे आहेत.
Infinix InBook X2 ची किंमत किंमत
Infinix InBook X2 लॅपटॉपच्या Intel Core i3 मॉडेलची किंमत 399 डॉलर (सुमारे 29,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर Intel Core i5 व्हेरिएंटसाठी 549 डॉलर (सुमारे 40,900 रुपये) मोजावे लागतील. सर्वात मोठ्या Intel Core i7 मॉडेल 649 डॉलर (सुमारे 48,300 रुपये) मध्ये विकत घेता येईल. सध्या या इनफिनिक्स लॅपटॉपची विक्री इजिप्त, इंडोनेशिया, थायलंड इत्यादी देशांमध्ये विकला जात आहे. परंतु लवकरच हा लॅपटॉप भारतात देखील येऊ शकतो.
Infinix InBook X2 चे स्पेसिफिकेशन्स
या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा फुलएचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेश्यो 16:9 आणि पीक ब्राईटनेस 300 निट्स आहे. इनफिनिक्सच्या या लॅपटॉपमध्ये बॅकलिट चिकलेट कीबोर्ड देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी लॅपटॉपमध्ये ड्युअल बँड Wi-Fi 802.11 ab/b/g/n/ac, Bluetooth v5.1, दोन USB Type-C पोर्ट, दोन USB 3.0 पोर्ट, HDMI 4.1 पोर्ट, SD कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
Infinix InBook X2 चे तीन मॉडेल सादर करण्यात आले आहेत. यात Intel Core i3-1005G1 प्रोसेसर, Intel Core i5-1035G1 आणि Intel Core i7-1065G7 प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. हे लॅपटॉप 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह विकत घेता येतील. Infinix InBook X2 सीरीजमध्ये लेटेस्ट Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल. तसेच या लॅपटॉपमध्ये 50Wh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W चार्जला सपोर्ट करते. ही बॅटरी 11 तास वेब ब्राउजिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
बंद होणार Vivo ची स्वस्त आणि मस्त Y Series?; भारतीय फॅन्सना मिळणार नाहीत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन