8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेली Infinix Note 10 Series भारतात लाँच; किंमत देखील आहे अविश्वसनीय!
By सिद्धेश जाधव | Published: June 7, 2021 02:54 PM2021-06-07T14:54:35+5:302021-06-07T14:55:10+5:30
Infinix Note 10 Pro series: इनफिनिक्स नोट 10 सीरीज येत्या 13 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Infinix हि कंपनी कमी किंमतीत चांगले फीचर्स देऊन Xiaomi व Realme ला टक्कर देण्याचे काम करत असते. आज देखील इनफिनिक्सने अशीच कामगिरी केली आहे. कंपनीने आज भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत जे Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro नावाने बाजारात दाखल झाले आहेत.
Infinix Note 10 Series ची किंमत
इनफिनिक्स नोट 10 प्रो हा स्मार्टफोन सिरीजमधील मोठा स्मार्टफोन आहे. Infinix Note 10 Pro च्या 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. इनफिनिक्स नोट 10 दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे, तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 11,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. इनफिनिक्स नोट 10 सीरीज येत्या 13 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Infinix Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स नोट 10 प्रो मध्ये 1080 × 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.95 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 11 वर चालणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेट आणि माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे.
Infinix Note 10 Pro मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये, 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Infinix Note 10 चे स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स नोट 10 बद्दल बोलायचे तर, हा फोन देखील 1080 × 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.95 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो ज्यात 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 7.6 वर लाँच झाला असून यात मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट मिळतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी56 जीपीयूला सपोर्ट करतो.
Infinix Note 10 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. या कॅमेरा सेटअपमधील दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरीला देण्यात आली आहे.