8GB Ram आणि 5,000mAh बॅटरीसह येईल हा स्वस्त फोन; 7 जूनला होतील भारतात लॉन्च
By सिद्धेश जाधव | Published: June 2, 2021 07:18 PM2021-06-02T19:18:41+5:302021-06-02T19:19:39+5:30
Infinix Note 10 series launch: इनफिनिक्स नोट 10 सीरीजच्या भारतातील लाँचची घोषणा कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर व्हिडीओ पोस्ट करून केली.
Infinix ने ‘नोट 10’ सीरीज सादर जागतिक बाजारात काही दिवसांपूर्वी लाँच केली होती. या सिरीजमध्ये Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro हे दोन फोन लाँच करण्यात आले होते. या हि सिरीज भारतात घेऊन येण्याची घोषणा इनफिनिक्स इंडियाने केली आहे. Infinix Note 10 Series येत्या 7 जूनला भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. (Infinix Note 10 Series will be available on Flipkart)
Infinix Note 10 Series चा भारतातील लॉन्च आणि सेल
इनफिनिक्स नोट 10 सीरीजच्या भारतातील लाँचची घोषणा कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर व्हिडीओ पोस्ट करून केली. कंपनीने सांगितले आहे कि 7 जूनला ईवेंटचे आयोजन केले जाईल आणि त्या इवेंटद्वारे Infinix Note 10 सीरीज भारतीय बाजारात येईल. तसेच इनफिनिक्स नोट 10 सीरीजची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल.
Infinix Note 10 चे स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स नोट 10 मध्ये 1080 × 2460 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.95 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह येतो. हा स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 7.6 मिळतो. फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट आणि माली जी56 जीपीयू आहे. हा फोन 6GB RAM + 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
Infinix Note 10 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी आहे.
Infinix Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स
इनफिनिक्स नोट 10 प्रो 1080 × 2460 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.95 इंचाच्या फुलएचडी+ पंचहोल डिस्प्लेसह लॉन्च झाला आहे, जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. अँड्रॉइड 11 सह येणाऱ्या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी95 चिपसेट आणि माली जी76 जीपीयू आहे. हा फोन 8GB RAM + 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
Infinix Note 10 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा आहे, ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.