लाँच झाले बजेट फ्रेंडली Infinix Note 11 आणि Note 11 Pro स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: October 13, 2021 04:51 PM2021-10-13T16:51:06+5:302021-10-13T16:51:18+5:30

Infinix Note 11 Pro And Infinix Note 11 Price Specs Details: Infinix Note 11 आणि Note 11 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाले आहेत. हे दोन्ही फोन लवकरच भारतीय बाजारात देखील दिसू शकतात.  

Infinix note 11 and infinix note 11 pro smartphone launch check price and specifications  | लाँच झाले बजेट फ्रेंडली Infinix Note 11 आणि Note 11 Pro स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत 

लाँच झाले बजेट फ्रेंडली Infinix Note 11 आणि Note 11 Pro स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत 

Next

इनफिनिक्सने आपल्या Note 11 series मध्ये दोन नवीन दमदार स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Infinix Note 11 आणि Note 11 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाले आहेत. यातील Infinix Note 11 Pro स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देण्यात आली आहे. तर Infinix Note 11 चे काही स्पेक्स अजूनही गुलदस्त्यात आहेत.  

Infinix Note 11 Pro स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले मिळतो. विशेष म्हणजे 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा हा कंपनीचा पहिलाच फोन आहे. हा डिवाइस 180Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनला MediaTek Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB 2 स्टोरेज मिळते. यातील एक्सटेंडेड रॅम फिचरच्या मदतीने 3GB अतिरिक्त रॅम मिळतो.हा फोन Android 11 वर आधारित XOS 10 वर चालतो.  

Infinix Note 11 Pro च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 30x डिजिटल झूम असलेला 13-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचे बोकेह लेन्स मिळते. यातील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

Infinix Note 11 चे स्पेसिफिकेशन्स 

वर सांगितल्याप्रमाणे Infinix Note 11 चे संपूर्ण स्पेक्स अजून समजले नाहीत. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल (टेलीफोटो) ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. यातील 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. Android 11 वर आधारित युजर इंटरफेस X10 वर चालणार हा फोन एक्सटेंडेड रॅम फिचरसह सादर करण्यात येईल.  

Infinix Note 11 आणि Note 11 Pro ची किंमत 

Infinix Note 11 Pro स्मार्टफोन अमेरिकेत 249 डॉलर (सुमारे 18,760 ₹) मध्ये विकत घेता येईल. Infinix Note 11 च्या किंमतीसाठी मात्र वाट बघावी लागले. हे दोन्ही फोन लवकरच भारतीय बाजारात देखील दिसू शकतात.  

Web Title: Infinix note 11 and infinix note 11 pro smartphone launch check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.