Budget Phones: 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दोन स्वस्त पण शानदार फोन झाले लाँच; जाणून घ्या स्पेक्स  

By सिद्धेश जाधव | Published: December 13, 2021 03:38 PM2021-12-13T15:38:06+5:302021-12-13T15:38:33+5:30

Budget Phones: Infinix नं आज भारतात Infinix Note 11 आणि Note 11S हे दोन फोन्स सादर केले आहेत. या फोन्समध्ये 50MP Camera, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जिंग, असे फीचर्स मिळतात.

Infinix note 11 and note 11s smartphones launched in india  | Budget Phones: 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दोन स्वस्त पण शानदार फोन झाले लाँच; जाणून घ्या स्पेक्स  

Budget Phones: 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दोन स्वस्त पण शानदार फोन झाले लाँच; जाणून घ्या स्पेक्स  

Next

Budget Phones:  Infinix Note 11 सीरीज आज Infinix Note 11 आणि Note 11S या दोन फोन्ससह भारतात आली आहे. कंपनीनं या फोन्समध्ये 50MP Camera, 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जिंग असे फीचर्स दिले आहेत. हे इनफिनिक्स स्मार्टफोन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकत घेता येतील. 

Infinix Note 11 आणि Note 11S ची किंमत 

Infinix Note 11 स्मार्टफोनचा 4GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन 23 डिसेंबरपासून Flipkart वरून खरेदी करता येईल. तर Infinix Note 11S स्मार्टफोनचा 6GB/64GB व्हेरिएंट 12,999 रुपये आणि 8GB/128GB व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 20 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर येईल.  

Infinix Note 11 स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 11 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले आहे, जो फुल एचडी+ रेजोल्यूशन आणि 750 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो . या फोनमध्ये कंपनीने Helio G88 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali G52 GPU देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.   

फोटोग्राफीसाठी Infinix NOTE 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा मुख्य सेन्सर, 2MP ची बोकेह लेन्स आणि अजून एक एआय सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. तसेच इनफिनिक्स हा फोन Android 11 OS आधारित XOS10 वर चालतो. फोनमध्ये साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

Infinix Note 11S चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 11S स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. Infinix Note 11S मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा इनफिनिक्स फोन Android 11 आधारित XOS 7.6 वर चालतो. यातील 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Web Title: Infinix note 11 and note 11s smartphones launched in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.