बजेट सेगमेंटमध्ये Infinix Note 11 ने घेतली एंट्री; मोठा डिस्प्ले आणि बॅटरीसह घेता येणार विकत
By सिद्धेश जाधव | Published: November 3, 2021 03:30 PM2021-11-03T15:30:42+5:302021-11-03T15:30:51+5:30
Infinix Note 11 Price In India: इनफिनिक्स नोट 11 आता अधिकृतपणे कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 6GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे.
गेल्या महिन्यात Infinix ने Note 11 सीरिजची घोषणा केली होती. या सीरिजमध्ये Infinix Note 11 Pro आणि Infinix Note 11 या दोन फोन्सची घोषणा केली होती. यातील प्रो व्हेरिएंटच्या स्पेक्ससह किंमतीची माहिती कंपनीने दिली होती, परंतु Note 11 चे फक्त नाव सांगण्यात आले होते. इनफिनिक्स नोट 11 आता अधिकृतपणे कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे.
Infinix Note 11 चे स्पेसिफिकेशन
Infinix Note 11 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले आहे, जो फुल एचडी+ रेजोल्यूशन आणि 650 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो . या फोनमध्ये कंपनीने Helio G88 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. या डिवाइसचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आणि मोठ्या व्हर्जनमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Infinix NOTE 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा मुख्य सेन्सर, 2MP ची बोकेह लेन्स आणि अजून एक एआय सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Infinix Note 11 ची किंमत आणि उपलब्धता
कंपनीने Infinix Note 11 च्या किंमतीचा खुलासा अजूनही केलेला नाही. परंतु हा फोन 12,000 रुपयांच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो, असे काही मीडिया रिपोर्ट्समधून समजले आहे. याच आठवड्यात Infinix ने Note 11 सीरीज आणि INBook X1 लॅपटॉप डिसेंबरमध्ये भारतात येणार असल्याची घोषणा केली होती.