Infinix नं घेतला शाओमी-रियलमीशी पंगा! सर्वांच्या बजेटमध्ये 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: May 17, 2022 12:55 PM2022-05-17T12:55:36+5:302022-05-17T12:56:09+5:30

Infinix Note 12 सीरीज अंतगर्त Infinix Note 12 VIP आणि Infinix Note 12 असे दोन दमदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत.  

Infinix Note 12 VIP Launch With 108mp Camera With Infinix Note 12 Price Specifications Details  | Infinix नं घेतला शाओमी-रियलमीशी पंगा! सर्वांच्या बजेटमध्ये 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन 

Infinix नं घेतला शाओमी-रियलमीशी पंगा! सर्वांच्या बजेटमध्ये 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन 

googlenewsNext

इनफिनिक्सनं पुन्हा एकदा रेडमी-रियलमी सारख्या बजेट सेगमेंटमधील ब्रँडशी पंगा घेतला आहे. कंपनीनं पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमध्ये शानदार स्पेक्ससह दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. Infinix Note 12 VIP हा स्मार्टफोन कंपनीच्या Note 12 सीरीजचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, MediaTek Helio G96 प्रोसेसर, 13GB RAM, 108MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगला मिळते. सोबत Infinix Note 12 (G96) नं देखील एंट्री घेतली आहे. दोन्ही फोन्सच्या कॅमेरा आणि बॅटरीमध्ये फरक आहे, अन्य फीचर्स सारखेच आहेत.  

Infinix Note 12 VIP चे स्पेसिफिकेशन्स 

इनफिनिक्स नोट 12 व्हीआयपी फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याला MediaTek Helio G96 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 5GB व्हर्च्युअली RAM मिळून एकूण 13GB RAM आहे. हँडसेटमध्ये Android 12 बेस्ड XOS 10.6 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा आहे. तसेच 13MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर मिळतो. फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. या व्हीआयपी पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W हायपर चार्ज सिस्टमला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त 17 मिनिटांत हा फुलचार्ज होतो.  

Infinix Note 12 (G96) चे स्पेसिफिकेशन्स  

इनफिनिक्स नोट 12 (G96) चे मोठ्याप्रमाणावर स्पेसिफिकेशन्स व्हीआयपी व्हेरिएंट सारखे आहेत. फक्त Infinix Note 12 (G96) मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. तर यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

किंमत  

Infinix Note 12 VIP ची किंमत 300 डॉलर्स (जवळपास 23,300 रुपये) आहे. Infinix Note 12 ची किंमत 200 डॉलर्स (जवळपास 15,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. जागतिक बाजारात आलेले हे फोन्स लवकरच भारतात देखील येऊ शकतात.  

Web Title: Infinix Note 12 VIP Launch With 108mp Camera With Infinix Note 12 Price Specifications Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.