कमी किंमतीत 5000mAh बॅटरीसह शानदार Infinix Smart 6 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: October 27, 2021 12:28 PM2021-10-27T12:28:36+5:302021-10-27T12:29:00+5:30
New Phone Under 10K Infinix Smart 6: Infinix Smart 6 स्मार्टफोन बजेट रेंज लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.
चीनी स्मार्टफोन निर्माता Infinix ने आपला बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Infinix Samrt 6 नावाने बाजारात उपलब्ध होईल. हा फोन याआधी लाँच झालेल्या Infinix Smart 5 ची जागा घेईल. यात 5000mAh ची बॅटरी, ड्युअल रियर कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेसआयडी असे फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया Infinix Smart 6 ची किंमत आणि स्पेक्स.
Infinix Smart 6 ची किंमत
Infinix Smart 6 स्मार्टफोन एकच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. याची किंमत 120 डॉलर ठेवण्यात आली आहे. ही किंमत 9,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीचा इतिहास पाहता हा फोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो.
Infinix Smart 6 चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 226PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये UNISOC SC9863A प्रोसेसरवर चालतो, त्याचबरोबर 2GB RAM आणि 32GB स्टोरेजसह येतो. डिवाइस Android 11 Go Edition वर चालतो.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.08MP चा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा एक ड्युअल सिम 4G फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 6 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ब्लॅक, ग्रीन, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.