या फोनवर टिकणार नाहीत रोगांचे सूक्ष्मजंतू; 7,499 रुपयांमध्ये लाँच झाला हटके स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: April 27, 2022 05:52 PM2022-04-27T17:52:08+5:302022-04-27T17:52:15+5:30
कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे.
Infinix नं भारतात एक हटके स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं आपल्या Smart सीरीजमध्ये Infinix Smart 6 ची भर टाकली आहे. या फोनचे बाकी फीचर्स एका सामान्य बजेट डिवाइससारखे आहेत, परंतु यातील अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनलचं कौतुक कंपनी लाँचच्या आधीपासून करत आहे. या स्मार्टफोनच्या पॅनलवर सुक्षजंतू टिकणार नाहीत यासाठी सिल्व्हर ऑयन स्प्रे करण्यात आला आहे.
Infinix Smart 6 ची किंमत
एंट्री लेव्हल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये 64GB मेमरी असलेला हा एकमेव डिवाइस असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. याची किंमत 7,499 रुपये ठेवण्यात आली आहे. पोलर ब्लॅक, हार्ट ऑफ ओशियन, लाईट सी ग्रीन आणि स्टारी पर्पल असे कलर व्हेरिएंट बाजारात आले आहेत. हा हँडसेट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
Infinix Smart 6 चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 226PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. डिवाइस Android 11 Go Edition वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो. कंपनीनं 2GB वर्चुअल रॅम देखील दिला आहे. मेमरी देखील 512GB पर्यंत मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8MP चा मुख्य कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक ड्युअल सिम 4G फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 6 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.