Infinix X1 40 अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; कमी किंमतीत शानदार फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:08 PM2021-07-30T17:08:34+5:302021-07-30T17:10:22+5:30

Infinix ने गेल्यावर्षी X1 अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही सीरिज लाँच केली होती. यात आता कंपनीने या सीरीजमध्ये 40 इंचाचा नवीन मॉडेल जोडला आहे. 

Infinix x1 40 inch smart android tv launched in india at rs 19999 on flipkart  | Infinix X1 40 अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; कमी किंमतीत शानदार फीचर्स 

Infinix X1 40 अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; कमी किंमतीत शानदार फीचर्स 

Next

Infinix ने गेल्यावर्षी लाँच केलेल्या X1 Android Smart TV सीरिज मध्ये एक 40 इंचाचा मॉडेल जोडला आहे. याआधी या सीरिजमध्ये 32 आणि 43 इंचाचे मॉडेल कंपनीने लाँच केले आहेत. हे तिन्ही मॉडेल आयकेयर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. हा स्मार्ट टीव्ही 8 ऑगस्टपासून Flipkart वरून 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Infinix X1 40 इंच स्पेसिफिकेशन्स  

Infinix X1 40 इंच मॉडेलमध्ये ट्रू बेजल-लेस फ्रेम-लेस डिजाइनसह 40-इंचाचा एलईडी पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या परफॉर्मन्ससाठी यात EPIC 2.0 इमेज इंजिन अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही HDR10 ला सपोर्ट करतो, त्यामुळे कलर, शार्पनेस, कॉन्ट्रास्ट आणि क्लियरिटीसह व्हिडीओचा अनुभव घेता येतो. हा स्मार्ट टीव्ही 350 निट्स ब्राइटनेस, ऑटो डिमिंग आणि लाइटिंग अ‍ॅडजस्टमेंट फीचरसह सादर करण्यात आला आहे. यातील EyeCare टेक्नॉलॉजी स्क्रीनमधून येणारी निळी किरणे नियंत्रित करते.  

Infinix X1 मध्ये बिल्ट इन बॉक्स स्पिकर देण्यात आले आहेत. कंपनीने यात 24W चा बॉक्स स्पीकर दिला आहे. जो डॉल्बी ऑडियो फीचरला सपोर्ट करतो. हा स्मार्ट टीव्ही Android TV ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात MediaTek 64 बिट क्वॉड कोर प्रोसेसर मिळतो. Infinix X1 मध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. 

Infinix X1 मध्ये बिल्ट-इन Google Chromecast  सपोर्ट मिळतो. तसेच हा टीव्ही नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम, युट्युबसह 5000 पेक्षा जास्त अँड्रॉइड अ‍ॅप्सना सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीच्या रिमोटवर वन-टच गुगल असिस्टंस फीचर देखील देण्यात आला आहे. 

Web Title: Infinix x1 40 inch smart android tv launched in india at rs 19999 on flipkart 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.