3,000 रुपयांच्या डिस्काउंटसह Infinix X1 अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही उपलब्ध; जाणून घ्या सविस्तर माहिती
By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 07:16 PM2021-09-13T19:16:08+5:302021-09-13T19:16:34+5:30
Infinix X1 अँड्रॉइड स्मार्ट टीव्हीवर मर्यादित कालावधीसाठी 3,000 रुपयांच्या डिस्काउंट दिला जात आहे.
Infinix X1 अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही सिरीजमध्ये तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यातील 32-इंच, 40-इंच आणि 43-इंचाच्या मॉडेल्सवर सूट देण्यात येत आहे. हे तिन्ही स्मार्ट टीव्ही मॉडेल Flipkart वर गुरवार 16 सप्टेंबरपर्यंत डिस्काउंटसह विकत घेता येतील. यातील 40-इंचाचा मॉडेल जुलै तर 32 आणि 43-इंचाचे मॉडेल्स गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सादर करण्यात आले होते. या तिन्ही मॉडेलमध्ये मीडियाटेकचा प्रोसेसर आणि 1GB रॅम देण्यात आला आहे.
Infinix X1 स्मार्ट टीव्हीची किंमत आणि ऑफर्स
Infinix X1 Android Smart TV मॉडेल्सवर फ्लिपकार्ट मर्यादित कालावधीसाठी 3,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. ही सूट 12 सप्टेंबरपासून सुरु होऊन 16 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहेत. या सीरिजमधील 40-इंचाचा मॉडेल 22,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, जो 26,990 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. 17,999 रुपयांमध्ये मिळणारा 32-इंचाचा मॉडेल ऑफर अंतर्गत 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 24,999 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 43-इंचाचा मॉडेल्ससाठी 22,999 रुपये मोजावे लागतील.
Infinix X1 40 इंच स्पेसिफिकेशन्स
Infinix X1 40 इंच मॉडेलमध्ये ट्रू बेजल-लेस फ्रेम-लेस डिजाइनसह 40-इंचाचा एलईडी पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या परफॉर्मन्ससाठी यात EPIC 2.0 इमेज इंजिन अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही HDR10 ला सपोर्ट करतो, त्यामुळे कलर, शार्पनेस, कॉन्ट्रास्ट आणि क्लियरिटीसह व्हिडीओचा अनुभव घेता येतो. हा स्मार्ट टीव्ही 350 निट्स ब्राइटनेस, ऑटो डिमिंग आणि लाइटिंग अॅडजस्टमेंट फीचरसह सादर करण्यात आला आहे. यातील EyeCare टेक्नॉलॉजी स्क्रीनमधून येणारी निळी किरणे नियंत्रित करते.
Infinix X1 मध्ये बिल्ट इन बॉक्स स्पिकर देण्यात आले आहेत. कंपनीने यात 24W चा बॉक्स स्पीकर दिला आहे. जो डॉल्बी ऑडियो फीचरला सपोर्ट करतो. हा स्मार्ट टीव्ही Android TV ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात MediaTek 64 बिट क्वॉड कोर प्रोसेसर मिळतो. Infinix X1 मध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
Infinix X1 मध्ये बिल्ट-इन Google Chromecast सपोर्ट मिळतो. तसेच हा टीव्ही नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, युट्युबसह 5000 पेक्षा जास्त अँड्रॉइड अॅप्सना सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीच्या रिमोटवर वन-टच गुगल असिस्टंस फीचर देखील देण्यात आला आहे.