1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स
By सिद्धेश जाधव | Published: February 18, 2022 12:51 PM2022-02-18T12:51:14+5:302022-02-18T12:51:56+5:30
Infinix Zero 5G स्मार्टफोन 14 फेब्रुवारीला लाँच केला गेला होता. कंपनीचा हा सर्वात पहिला 5G स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी आला आहे.
Infinix Zero 5G भारतात 14 फेब्रुवारीला लाँच करण्यात आला होता. आजपासून या फोन च्या विक्रीला सुरुवात होणार आहे. लाँचच्या वेळीच कंपनीनं आपल्या पहिल्या 5G स्मार्टफोनच्या खरेदीवरील ऑफर्सची माहिती दिली होती. तसेच Flipkart देखील हा फोन 1200 रुपयांच्या आत विकत घेण्याची संधी देत आहे. चला जाणून घेऊया किंमत, ऑफर्स आणि स्पेक्स.
Infinix Zero 5G ची किंमत आणि ऑफर्स
Infinix Zero 5G च्या एकमेव 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वरून विकत घेता येईल. या फोनच्या खरेदीवर Infinix Snokor (iRocker) वायरलेस इयरबड्स फक्त 1 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तर Flipkart Smart Upgrade मध्ये हा हँडसेट फक्त 1175 रुपयांच्या EMI वर विकत घेता येईल.
Infinix Zero 5G चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Zero 5G मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 500निट्स ब्राईटनेस आणि 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 10 वर चालतो.
प्रोसेसिंगसाठी इनफिनिक्स झिरो 5जी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत वेगवान LPDDR5 RAM आणि लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. 5जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीमुळे गरज पडल्यास एकूण 13GB रॅमची ताकद मिळू शकते.
Infinix Zero 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 30X zoom सह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर क्वॉड एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर 27 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.
हे देखील वाचा:
- सर्वात स्वस्त 5G Smartphone! 8GB रॅमसह OnePlus Nord CE 2 5G ची भारतात एंट्री
- Instagram रिल्समुळे डेटा संपतोय? ही सोप्पी ट्रिक वाचवेल निम्मा डेटा