परवडणाऱ्या किंमतीत आला Infinix चा पहिला 5G Smartphone; खरेदीवर जबरदस्त Earbuds मोफत
By सिद्धेश जाधव | Published: February 14, 2022 03:29 PM2022-02-14T15:29:54+5:302022-02-14T15:30:58+5:30
Infinix Zero 5G Price In India: 13GB RAM की पॉवर सोबतच 48MP Camera, 33W 5,000mAh Battery आणि 13 5G Bands असलेला Infinix Zero 5G लाँच झाला आहे.
Infinix नं ठरल्याप्रमाणं भारतातील आपला पहिला 5जी स्मार्टफोन सादर केला आहे. 13GB RAM की पॉवर सोबतच 48MP Camera, 33W 5,000mAh Battery आणि 13 5G Bands असलेला Infinix Zero 5G लाँच झाला आहे. या बजेट सेगमेंट एवढे बँड्स असलेला हा एकमेव स्मार्टफोन असू शकतो. या हँडसेटची किंमत कंपनीनं 20 हजारांच्या आत ठेवली आहे. सोबत कंपनी Earbuds मोफत देत आहे.
Infinix Zero 5G चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Zero 5G मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 500निट्स ब्राईटनेस आणि 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 10 वर चालतो.
प्रोसेसिंगसाठी इनफिनिक्स झिरो 5जी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत वेगवान LPDDR5 RAM आणि लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. 5जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीमुळे गरज पडल्यास एकूण 13GB रॅमची ताकद मिळू शकते.
Infinix Zero 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 30X zoom सह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर क्वॉड एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर 27 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.
Infinix Zero 5G ची किंमत
हा फोन एकच व्हेरिएंटमध्ये भारतात दाखल झाला आहे, जो 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं भारतात Infinix Zero 5G फोनची किंमत 19,999 रुपये ठेवली आहे. परंतु जर तुम्ही 1 रुपये जास्त दिला तर 999 रुपयांचे Infinix SNOKER iRocker True Wireless Earbuds मोफत मिळतील.
हे देखील वाचा:
- Smartwatch: तुम्हाला किती गाढ झोप लागते हे सांगणार Smartwatch; झोपेची गुणवत्ता एका क्लीकमध्ये समजणार
- जुन्या नोटा आणि नाणी करू शकतात तुम्हाला मालामाल; ‘या’ 5 वेबसाईट करतील मदत