रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: February 5, 2022 07:47 PM2022-02-05T19:47:21+5:302022-02-05T19:47:31+5:30

Infinix Zero 5G India Launch: Infinix Zero 5G भारतात 20 हजारांच्या आत सादर केला जाईल असं दिसतं आहे. हा फोन 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाईल.

Infinix Zero 5G Smartphone Will Launch In India On 14 February Price Under Rs 20000  | रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

googlenewsNext

Infinix Zero 5G भारतात 14 फेब्रुवारीला लाँच होणार आहे. हा कंपनीचा पहिला 5G स्मार्टफोन आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. यासाठी एक खास पेज ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाईव्ह करण्यात आलं आहे. या पेजवरून फोनमधील ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक डायमेनसिटी 900 प्रोसेसरचा खुलासा झाला आहे.  

काही दिवसांपूर्वी कंपनीनं या फोनची रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाच्या 5G स्मार्टफोन्सची तुलना केल्याचं ट्विट वायरल झालं होतं. त्यामुळे Infinix Zero 5G भारतात 20 हजारांच्या आत सादर केला जाईल असं दिसतं आहे. हा फोन 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाईल.  

Infinix Zero 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशन आहे. हा डिस्प्ले बेजल लेस आणि पंच होल डिजाईनसह सादर करण्यात येईल. फोनच्या डावीकडे व्हॉल्युम बटन आणि उजवीकडे फिंगरप्रिंट व पॉवर बटन देण्यात आली आहे.    

Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक Dimensity 900 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सोबत ग्राफिक्ससती Mali G68 GPU देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालेल. फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा, अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि टेलीफोटो लेन्स मिळू शकते. पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी 33W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येईल.  

हे देखील वाचा:

12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

Web Title: Infinix Zero 5G Smartphone Will Launch In India On 14 February Price Under Rs 20000 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.