स्वस्त Infinix Zero X Neo स्मार्टफोन भारतीय लाँचच्या मार्गावर; MediaTek Helio G90 चिपसेटसह होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: August 30, 2021 05:03 PM2021-08-30T17:03:38+5:302021-08-30T17:03:58+5:30

Infinix Zero X Neo India Launch: Infinix Zero X Neo स्मार्टफोन Bluetooth SIG, Google Play Console आणि आता BIS सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे.

Infinix zero x neo smartphone will be launched in india with mediatek helio g90 chipset  | स्वस्त Infinix Zero X Neo स्मार्टफोन भारतीय लाँचच्या मार्गावर; MediaTek Helio G90 चिपसेटसह होऊ शकतो लाँच 

प्रतीकात्मक फोटो

Next

Infinix चा Infinix Zero X Neo स्मार्टफोन लवकरच भारतात येऊ शकतो. हा स्मार्टफोन अलीकडेच ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) वर लिस्ट करण्यात आला होता. याआधी हा स्मार्टफोन Bluetooth SIG आणि Google Play Console वर देखील दिसला होता. BIS सर्टिफिकेशनवरून Zero X Neo स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही. परंतु यावरून या स्मार्टफोनचा भारतीय लाँच नजीक असल्याचे समजते.  

Infinix Zero X Neo स्पेसिफिकेशन्स 

Infinix Zero X Neo स्मार्टफोन Bluetooth SIG, Google Play Console आणि आता BIS सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या फोनचे काही स्पेक्स लीक झाले आहेत. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी मॉडेल नंबर X6810 सह लिस्ट करण्यात आला होता. तसेच या फोनमध्ये MediaTek Helio G90 चिपसेट मिळणार असल्याची बातमी देखील समोर आली होती.  

इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा आकार किती असेल, याची माहिती मिळाली नाही. परंतु या फोनमधील डिस्प्लेचे रिजोल्यूशन Full-HD+ (1080 x 2460 पिक्सल) असू शकते. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज दिली जाऊ शकते. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन याआधी Malaysia च्या SIRIM सर्टिफिकेशन साईटवर Infinix Zero M नावाने लिस्ट झाला होता. कदाचित हा फोन मलेशियात वेगळ्या नावाने सादर केला जाऊ शकतो. मलेशियामध्ये हा फोन Mediatek Helio G95 सह लाँच केला जाऊ शकतो.  

Infinix Concept Phone 2021 ची वैशिष्ट्ये  

Infinix Concept Phone 2021 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या साइड फ्रेममध्ये कोणताही बटण दिसत नाही. या कॉन्सेप्ट स्मार्टफोनच्या रियर पॅनलमध्ये कलर बदलणारी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जेव्हा फोन चार्ज केला जातो तेव्हा बॅक पॅनल चमकू लागतो. Infinix Concept Phone 2021 मधील 20 टेम्परेचर सेन्सर या फोनचे टेम्परेचर 40 डिग्री सेल्सियस राखण्याचे काम करतात.   

या फोनमधील फोटोग्राफी सेगमेंट देखील तितकाच खास आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमधील इतर सेन्सर्सची माहिती मिळाली नाही परंतु, फोनच्या मागे 8 मेगापिक्सलची पेरिस्कोप लेन्स देण्यात आली आहे. ही लेन्स 60x जूमला सपोर्ट करते.   

Web Title: Infinix zero x neo smartphone will be launched in india with mediatek helio g90 chipset 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.