इन्फीक्स 'झीरो ५ प्रो'च्या विक्रीस प्रारंभ : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: December 7, 2017 11:11 AM2017-12-07T11:11:10+5:302017-12-07T12:32:51+5:30
इन्फीक्स कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या इन्फीक्स झीरो ५ प्रो या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून विक्री सुरू झाली आहे.
इन्फीक्स कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या इन्फीक्स झीरो ५ प्रो या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून विक्री सुरू झाली आहे.
इन्फीक्स कंपनीने ऑगस्ट महिन्यात नोट ४ आणि नोट ४ प्रो हे दोन मॉडेल सादर केले होते. यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस इन्फीक्स झीरो आणि झीरो ५ प्रो या दोन मॉडेलची घोषणा करण्यात आली होती. यापैकी इन्फीक्स झीरो या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली होती. तर झीरो ५ प्रो हे मॉडेल आता ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. यात ५.९८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १२८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी २५ या प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम ६ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असेल. या मॉडेलमध्ये मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट देण्यात आला असून याच्या मदतीने अतिरीक्त १२८ जीबी स्टोअरेज वाढविता येणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा स्कीन एक्सओएस ३.० हा युजर इंटरफेस असेल.
इन्फीक्स झीरो ५ प्रो स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपने सज्ज आहे. याच्या मागील बाजूस सोनी आयएमएक्स ३८६ सेन्सर, एफ/२.० अपार्चर व ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. याच्या जोडीला टेलिफोटो लेन्स, एफ/२.६ अपार्चर आणि २ एक्स ऑप्टीकल झूमयुक्त दुसरा कॅमेरा असेल. या दोन्ही कॅमेर्यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे दर्जेदार प्रतिमा घेता येतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशसह तब्बल १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन फास्ट चार्जींगयुक्त ४,५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असेल. तर यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. इन्फीक्स झीरो ५ प्रो हा स्मार्टफोन ग्राहकांना १९,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.