इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 01:05 PM2017-12-20T13:05:15+5:302017-12-20T13:06:59+5:30

इनफोकस कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा तसेच ड्युअल कॅमेरायुक्त व्हिजन ३ हा स्मार्टफोन अवघ्या ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

Infocus full view display smartphone | इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

googlenewsNext
ठळक मुद्देइनफोकस व्हिजन ३ या मॉडेलमधील दुसरे लक्ष्यवेधी फिचर म्हणजे यातील ड्युअल कॅमेरा सेटअप होय.अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणार्‍या या स्मार्टफोनमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.

इनफोकस कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा तसेच ड्युअल कॅमेरायुक्त व्हिजन ३ हा स्मार्टफोन अवघ्या ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. सध्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये कडा नसणार्‍या (बेझललेस) डिस्प्ले दिला जात आहे. या प्रकारचे फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले उच्च व मध्यम श्रेणीतील मॉडेल्समध्ये दिले जात आहेत. मात्र इनफोकस व्हिजन ३ या एंट्री लेव्हलच्या स्मार्टफोनमध्येही याच प्रकारचा स्क्रीन देण्यात आला आहे.

अर्थात हा या स्मार्टफोनचा सेलींग पॉइंट ठरू शकतो. फिचर्सचा विचार केला असता इनफोकस व्हिजन ३ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा वर नमूद केल्यानुसार फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले १८:९ असे गुणोत्तराचे प्रमाण असणारा असेल. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३५ प्रोसेसर असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

इनफोकस व्हिजन ३ या मॉडेलमधील दुसरे लक्ष्यवेधी फिचर म्हणजे यातील ड्युअल कॅमेरा सेटअप होय. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे देण्यात आले असून यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. याच्या एकत्रीत परिणामामुळे उच्च दर्जाची छायाचित्रे काढता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणार्‍या या स्मार्टफोनमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले आहे.  तसेच फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

Web Title: Infocus full view display smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल