इन्स्टाग्रामने युजर्ससाठी आणलं 'हे' भन्नाट फीचर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:04 PM2019-01-14T15:04:03+5:302019-01-14T15:15:12+5:30

इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करू शकतात.

instagram to add new feature for users to post from multiple accounts at the same time | इन्स्टाग्रामने युजर्ससाठी आणलं 'हे' भन्नाट फीचर 

इन्स्टाग्रामने युजर्ससाठी आणलं 'हे' भन्नाट फीचर 

Next
ठळक मुद्दे इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. फीचरच्या मदतीने युजर्स एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करू शकतात. नव्या फीचरमुळे मल्टिपल अकाऊंट एकाचवेळी मॅनेज करणं अधिक सोपं होणार आहे. 

नवी दिल्ली - सोशल मीडियावर कमी काळात फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. यावेळी ही इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करू शकतात. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार इन्स्टाग्राम युजर्स आता मल्टिपल अकाऊंट्सवरून एकच कंटेंट एकाच वेळी पोस्ट करू शकतो. 

इन्स्टाग्रामवर युजर्सना याआधी वेगवेगळ्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर करायची असल्यास थर्ड पर्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागत होती किंवा मग एका एका अकाऊंटवर जाऊन पोस्ट शेअर करावी लागत असे. मात्र आता या नव्या फीचरमुळे मल्टिपल अकाऊंट एकाच वेळी मॅनेज करणं अधिक सोपं होणार आहे. 

पोस्ट करताना युजर्सना  'Self-regram' हा पर्याय मिळणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर मल्टिपल अकाऊंटवरून पोस्ट करता येतं. सध्या हे फीचर फक्त आयओएससाठीच उपलब्ध आहे. अ‍ॅन्ड्रॉईडवर हे फीचर कधी येणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याआधी इन्स्टाग्रामने अंध युजर्ससाठी फोटोचं डिस्क्रिप्शन ऐकण्याचं फीचर आणलं होतं. 

 

Web Title: instagram to add new feature for users to post from multiple accounts at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.